Weight Loss : आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायाम न करणे आणि खाण्याच्या अयोग्य वेळा या सर्व गोष्टींमुळे वजन झपाट्याने वाढत चाललंय. अशात अनेकांना वजन कमी करायचंय मात्र ते झटपट कमी करायचंय.. वजन वाढणे ही आजकाल सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. यामुळे तुम्हाला विविध आजार जडतात, सोबत तुमची फिगरही खराब होते. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी धडपड करत असाल तर, पाणी केव्हा आणि कसे प्यावे? हे जाणून घ्या, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.


 


 तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त आहात?


वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळतात, विविध उपाय करून पाहतात. पण लठ्ठपणा काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय सांगत आहोत. यासाठी पुरेसे पाणी प्यावे. हे केवळ तुमच्या शरीराला हायड्रेशन करणार नाही तर शरीराचे काही इंच कमी करण्यास देखील मदत करेल. त्यासाठी पाणी केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घ्या.. जेणेकरून वजन कमी करण्यात मदत होईल.


 


वजन कमी करण्यासाठी पाणी कधी आणि कसे प्यावे?


जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. 
तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. 
याशिवाय लिंबू पाणी आणि कोथिंबिरीच्या पाण्याचा नित्यक्रमात समावेश केला जाऊ शकतो. हे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.
याशिवाय जेव्हाही तुम्ही जेवायला सुरुवात कराल तेव्हा अर्धा तास आधी पाणी प्या. यामुळे तुमचे पोट भरते, ज्यामुळे तुमच्या शरीरात कमी कॅलरी जातात. 
अशात प्रत्येकाने जेवणापूर्वी थोडे पाणी प्या. हा उपाय तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकतो.
योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात अन्न खाल्ल्यानंतरही भूक लागल्यास अन्न खाण्याऐवजी एक ग्लास पाणी प्या. 
यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहील आणि तुम्ही काहीही अनारोग्य खाणे टाळाल. 
याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्यावे.
पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय, ते चयापचय देखील वाढवते. जेव्हा तुमची चयापचय वाढली जाते, तेव्हा चरबी देखील जलद जळते.


 


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो टेन्शन कमी घ्या.. सतत तणावाखाली राहिल्यास पोट वाढते, कसे कमी कराल? जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )