Vitamin C Benefits : हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती खूप कमकुवत होत असते. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. व्हिटॅमिन सी त्वचा आणि केसांना सुंदर बनवण्यास मदत करते. त्यामुळेच व्हिटॅमिन सी असणारी फळे आणि भाज्या खायला हव्यात. 


व्हिटॅमिन सी असणारी फळे
संत्रे : संत्रमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. संत्र्यामध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. संत्री खाल्ल्याने हृदय आणि डोळे निरोगी राहतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.


पेरू : पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये 200 ग्रॅम पोषक तत्वे असतात.


पपई : पपई पचनासाठी उत्तम मानली जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. 


अननस : व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर अननस खायला हवे. त्यामुळे हाडेदेखील मजबूत होतात. 


स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक तत्वांनी युक्त फळ आहे. 


व्हिटॅमिन सी असणाऱ्या भाज्या
टोमॅटो : टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे भाज्यांमध्येदेखील टोमॅटोचा वापर करायला हवा. 


बटाटा : बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. बटाट्यामध्ये पोटॅशियमदेखील मोठ्या प्रमाणात आढळते. 


आवळा : आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असते. मध्यम आकाराच्या आवळ्यामध्ये 600 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते. 


लिंबू : रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असायला हवा. दररोज लिंबाचा वापर केल्याने व्हिटॅमिन सी ची कमतरता भासणार नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha