Health Tips : सध्या मानसिक बरोबरच शारीरिक आजाराचे देखील प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटीसुद्धा या आजाराचे शिकार होताना दिसतायत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री समंथा रुथ (Samantha Ruth Prabhu) प्रभूनं तिच्या आरोग्याबाबात माहिती दिली होती. समंथा मायोसायटिस (Myositis) या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलं. आता बॉलिवूड अभिनेता वरूण धवनही (Varun Dhawan) एका आजाराने त्रस्त आहे. वरूणने स्वत:च एका मुलाखतीत या संदर्भात माहिती दिली होती. वरूण सध्या वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) या आजाराचा सामना करत आहे. हा आजार नेमका काय आणि याची लक्षणं कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


वेस्टिब्युलर हायपोफंक्शन आजार म्हणजे काय? (What Is Vestibular Hypofunction) :


वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे कानाच्या आतील शिल्लक प्रणाली जी योग्यरित्या कार्य करत नाही. कानाच्या आत वेस्टिब्युलर प्रणाली आहे जी डोळ्यासह कार्य करते आणि स्नायू संतुलित करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ते नीट काम करत नाही, तेव्हा कानातून ऐकलेल्या गोष्टी मेंदूपर्यंत नीट पोहोचत नाहीत. अशा स्थितीत व्यक्तीला चक्कर येऊ लागते. पहिल्या 1-2 दिवसात चक्कर येणे आणि घबराटपणाची लक्षणे अधिक तीव्र असतात. तीन आठवड्यांनंतर रुग्ण सामान्य स्थितीत परत येतात. परंतु काही रुग्णांमध्ये डोके काही वेगाने हलवल्यानंतर काही महिने असंतुलन आणि उलटीची लक्षणे प्रभावी राहतात.


काय आहेत लक्षणं? (What are Symptoms) :


खराब रक्ताभिसरण, संसर्ग, कानात कॅल्शियमचा अपव्यय यांमुळे वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा आजार होऊ शकतो. चक्कर येणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे अशा प्रकारची अनेक प्रकारची लक्षणे या आजाराची असू शकतात. गाडी चालवतानाही दिसण्यात आणि चालवण्यात अडथळा येतो. काही प्रकरणांमध्ये, रुग्णांना मळमळ, चिंता, उलट्या देखील जाणवू शकतात. यासोबतच हळूहळू श्रवणशक्तीही संपुष्टात येऊ लागते.


यावर उपचार काय? 


व्हिएच (VH) म्हणजेच वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजारावर अनेक प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात. अँटिबायोटिक्स किंवा अँटीफंगल उपचार किंवा अगदी शस्त्रक्रियेद्वारे देखील यावर उपचार केले जाऊ शकतात.  डॉक्टरांच्या सल्ला न घेता कोणत्याही आजारावर उपचार घेऊ नये. 


महत्वाच्या बातम्या :


Samantha : सौंदर्यवती समंथाला जडलेला मायोसिटिस आजार काय आहे? काय आहेत त्याची लक्षणं?