Summer Health Care Tips : उन्हाळा आला की तहान अधिक लागते त्यामुळे लोकांचा आहारही कमी होतो. पण उन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत थोडी निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. उन्हाळ्यात उलट्या, जुलाब, पोटदुखी, गॅस, अपचन अशा पोटाच्या समस्या अधिक जाणवतात. तुम्ही उन्हात घराबाहेर पडता तर तुम्हाला उष्माघातही होतो. अशा परिस्थितीत, आपण आपले शरीर आणि पोट थंड ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच ऋतूनुसार आहार घेणे आवश्यक आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला उन्हाळ्यात खाल्ल्‍या अशा 5 भाज्यांबद्दल सांगत आहोत ज्या खाल्यामुळे तुमचे शरीर थंड राहील. त्यांचा आहारात नक्की समावेश करा.


काकडी : उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा. काकडीमध्ये भरपूर पोषक असतात. काकडी तुम्ही सलाड आणि भाजीच्या स्वरूपातही खाऊ शकता. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने पोट थंड राहते. काकडीत व्हिटॅमिन K आणि C असते, तसेच अँटिऑक्सिडंट्स देखील काकडीत मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.
 
शेवग्याच्या शेंगा : उन्हाळ्यात तुम्ही शेवग्याच्या शेंगा नक्की खाव्यात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. पचनक्रियेशी संबंधित आजार शेवग्याच्या सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून प्यायल्यास आराम मिळतो. यामध्ये भरपूर फायबर असते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. शेंगामध्ये व्हिटॅमिन के, प्रथिने, लोह, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक असतात.


दुधी भोपळा : दुधी भोपळा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी खूप फायदेशीर असते. यामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या, उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
 
कारले : कारले कडू असले तरी शरीरासाठी ते खूप फायदेशीर असते. कारल्याचा रस हृदय आणि पोटासाठी औषधाप्रमाणे काम करतो. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उन्हाळ्यात कारले खाल्ल्याने शरीर थंड राहते.


हिरव्या पालेभाज्या : उन्हाळ्यात पालक, राजगिरा, पुदिना यांसारख्या पालेभाज्याही खाव्यात. हिरव्या पालोभाज्या तुम्ही सूप, डाळ, पराठा, कोशिंबीर अशा कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये फोलेट आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे या भाज्या उन्हाळ्यातील समस्यांपासून बचाव करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha