Health Tips : झोप (Sleep) व्यवस्थित झाली नाही तर चिडचिड होणे, अॅसिडीटी होणे, डोकं दुखणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. काही डॉक्टरांचे मत आहे की, दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी. पण काहींना रात्री लवकरच झोप येत नाही. वेळेवर झोपण्यासाठी काही टीप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. काही पदार्थ खाल्ल्याने देखील झोप येत नाही. झोपण्याआधी या पदार्थांचे सेवन करणे टाळा-
रात्री झोपण्याआधी ड्रायफ्रुट्स, बीन्स, ब्रोकोली, फ्लॉवर इत्यादी खाणे टाळा. रात्री झोपण्याआधी फायबरचे प्रमाण जास्त असणारी फळं आणि भाजा खा. ज्यामुळे झोप चांगली येईल.
जास्त तिखट पदार्थांचे सेवन करणे टाळा
रात्री झोपण्याआधी जास्त तिखट पदार्थांचे सेवन करणे टाळा. तिखट पदार्थांचे सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढते. ज्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी होणे इत्यादी समस्या जाणवू शकते. यामुळे झोप लागत नाही.
मद्यपान करणं टाळा
तणाव निर्माण झाला किंवा दिवसभर जास्त काम करावं लागलं, तर अनेक लोक रात्री झोपताना मद्यपान करतात. पण रात्री मद्यपान करुन झोपण्याची सवय लागली तर मद्यपान न करता झोप येत नाही. मद्यपान करुनच झोपण्याची सवय लागते.
टोमॅटो खाणं टाळा
झोपण्यापूर्वी टोमॅटो खाऊ नये. टोमॅटोमध्ये ऑक्सालिक अॅसिड असते. ज्यामुळे सतत ढेकर येणे, अॅसिडिटी होणे इत्यादी समस्या जाणवतात. ज्यामुळे झोप लागत नाही. त्यामुळे झोपण्याआधी टोमॅटो खाणं टाळा.
आईस्क्रीम
आईस्क्रीम खायला अनेकांना आवडते. पण आईस्क्रीममुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. या हार्मोनमुळे फ्रेश वाटतं. यामुळे झोप येत नाही. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाऊ नये.
चहा-कॉफी
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. हे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे थकवा जातो. चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर झोप येत नाही. रात्री कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. तसेच पिझ्झा हा देखील अनेकांच्या आहाराचा एक भाग झाला आहे. पिझ्झा हा रात्री खाऊ नका. त्यात बटर आणि टोमॅटोचे मिश्रण असते. ज्यामुळे झोप येत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: