Skin Care Tips : किचनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्वचेच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत. त्वचेची काळजी घेण्याच्या घरगुती पद्धतींमध्ये त्यांचा वापर अनेक काळापासून केला जात आहे. पण, काहीवेळा त्वचेच्या काळजीशी संबंधित एखादी छोटीशी चूकही मोठे नुकसान करते. त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी केमिकलयुक्त फेस क्रीम्स वापरण्याऐवजी नैसर्गिक मॉइश्चरायझर्सचा वापर करता येतो.


शिया बटर : नैसर्गिक मॉइश्चरायझर शिया बटर बहुतेक स्कीन केअर उत्पादनांमध्ये वापरले जाते. ते तुमची त्वचा मऊ करण्यासाठी योग्य आहे. शिया बटर तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रीन म्हणून काम करू शकते कारण ते सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांना रोखते.


कोरफड : कोरफड त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मऊ होते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेची जळजळ आणि जखमा दूर करते. हे पुरळ चट्टे आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करू शकते. हे कोलेजन आणि इलॅस्टिन फायबरचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. यासाठी दररोज दोनदा कोरफडीचा रस तुमच्या त्वचेवर लावा.


बदामाचे तेल : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. बदाम तेल उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.  त्वचा मऊ आणि टवटवीत होण्यासाठी या तेलाने नियमित मसाज करणे फायद्याचे ठरते. कोरडेपणापासून त्वचेला वाचवण्यासाठी बदाम तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. 


गुलाबाच्या पाकळ्या आणि कोरफड : या दोन घटकांचा वापर करून तुम्ही स्वतःचे मॉइश्चरायझर घरीच तयार करू शकता. गुलाबाच्या पाकळ्या आणि कोरफड हे दोन्ही तेलकट त्वचेसाठी उत्तम घटक आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये टोनिंग आणि तुरट गुणधर्म असतात. कोरफडमध्ये दाहक-विरोधी आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे तेलकट त्वचेसाठी फायदेशीर असतात.


संबंधित बातम्या


Omicron Variant : सर्दी-खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत


Weight Loss : वजन कमी करण्यासाठी मध हा सर्वोत्तम उपाय, या पदार्थांसह मध खाल्ल्याने लठ्ठपणा होईल नाहीसा


Immunity Booster | व्हिटॅमिन 'सी' आणि 'डी'च नव्हे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्हिटॅमिन्सही महत्त्वाचे!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha