Liver Infection : यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा अवयव आहे. शरीरासाठी अनेक महत्त्वाची कार्ये पूर्ण करण्यासाठी यकृत (Liver) हे उपयुक्त आहे. अशा स्थितीत यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. विशेषत: यकृतामध्ये संसर्गाची समस्या असल्यास, त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे यकृताच्या संसर्गाची लक्षणे शरीरात दिसू लागल्यास रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते. यकृताच्या संसर्गाची नेमकी कोणती लक्षणे आहे हे जाणून घेऊयात. 


यकृताच्या संसर्गाची लक्षणे :



  • यकृताच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, तीव्र ओटीपोटात वेदना होतात. याशिवाय काही लोकांमध्ये पोट फुगण्याची समस्याही दिसून येते. 

  • यकृताशी संबंधित समस्या असल्यास कावीळची समस्या होऊ शकते. या परिस्थितीत, रुग्णाला त्वरित उपचार आवश्यक आहेत. 

  • लिव्हर इन्फेक्शन असल्यास त्वचेवर रॅशेस, सोलणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

  • लघवीचा रंग बदलल्यास यकृताचा संसर्ग होण्याचा धोका असतो. 

  • यकृताच्या संसर्गाने ग्रस्त रुग्णांना भूक कमी लागते.

  • काही लोकांना यकृताच्या संसर्गामुळे उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्या असू शकतात. 


यकृताचा संसर्ग रोखण्यासाठी टिप्स - यकृताचा संसर्ग कसा टाळावा 



  • यकृताचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांना त्यांची जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. 

  • दारू आणि धूम्रपानापासून दूर राहा. 

  • तेल आणि मसाल्यांचा वापर कमीत कमी करा. 

  • पुरेसे पाणी प्या. 

  • साखरेचे सेवन कमी करा. 

  • वजन संतुलित ठेवा. 

  • नियमित व्यायाम करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :