Running An Empty Stomach : धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि चुकीची आहारपद्धती (Wrong Diet) यांमुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. अशातच सध्या स्वतःला निरोगी (Health Care Tips) आणि तंदुरुस्त ठेवण्याचं मोठं आव्हान सध्या सर्वांसमोर निर्माण झालं आहे. असे अनेक लोक आहेत, जे सध्या फिटनेस (Fitness Tips) जपण्यासाठी धावण्याचा किंवा चालण्याचा पर्याय निवडतात. दररोज सकाळी जॉगिंग (Morning Walk) करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. धावल्यानं शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण चांगलं राहिल्यानं अनेक आजारांपासून शरीराचं रक्षण होतं.


धावण्यानं केवळ वजन कमी होत नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) देखील मजबूत होते आणि स्नायू देखील मजबूत राहतात. पण अनोशापोटी धावणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं की, काहीतरी खाऊन धावणं? कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, अनोशापोटी धावल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक तज्ज्ञही अनोशापोटी धावण्याचा सल्ला देतात. 


अनोशापोटी धावण्याचे आश्चर्यकारक फायदे


लठ्ठपणा कमी होतो (Reduces Obesity)


धकाधकीची जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती यांमुळे अनेकजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. जर तुम्हीही या समस्येनं त्रस्त असाल, तर धावणं तुमच्यासाठी सर्वात उत्तम व्यायाम ठरेल. त्यातल्या त्यात अनोशापोटी धावल्यानं आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. 


हृदयासाठी आरोग्यदायी (Healthy Heart)


जर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही दररोज 10-15 मिनिटं धावलं पाहिजे. हृदयाचे आरोग्य उत्तम राहातं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. 


पचनक्रिया सुधाण्यासाठी फायदेशीर (Beneficial For Improving Digestion)


अनोशापोटी धावल्यानं पचनक्रिया सुधारतं, आतड्यांसंबंधी आजार, मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या ठिक होऊ शकतात. 


चांगली झोप 


जे लोक चांगले धावतात त्यांना शांत झोप लागते. ज्यांना अपुरी झोप किंवा झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी अनोशापोटी धावणं हा उत्तम उपाय आहे. यामुळे आरोग्यही उत्तम राहतं. 


अनोशापोटी धावण्याचे तोटे 


पटकन थकवा येणं 


अनोशापोटी धावण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. अनोशापोटी धावल्यानं थकवा येतो. अनोशापोटी धावल्यानं शरीरातील फॅट्सचं रुपांतर उर्जेत होतं. त्यामुळे पटकन थकवा येतो. 


दुखापत होण्याचा धोका 


शरीरात उर्जेची कमतरता निर्माण झाल्यामुले लवकर थकवा जाणवू लागेल आणि शरीराला दुखापत होण्याची शक्यता आणखी वाढते. 


आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, धावण्याच्या 15-30 मिनिटं आधी केळी खावीत किंवा एनर्जी ड्रिंक प्यावेत. त्यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी सहज वाढते. एनर्जी ड्रिंकमुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मासिक पाळीत का होते सतत गोड खाण्याची इच्छा? 'या' क्रेविंगवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय कराल?