Health Tips : गोड खाणं अनेकांना आवडतं. त्यातच गुलाबजाम आणि रसगुल्ला या पदार्थांची नावं ऐकली तरी, तोंडाला पाणी सुटतं. जास्त गोड खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं म्हटलं जातं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रसगुल्ला आरोग्यासाठी लाभदायक आहे. रसगुल्ला आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आहारतज्ज्ञही काही विशिष्ट परिस्थितीत रसगुल्ला खाण्याचा सल्ला देतात. 


Rasgulla Health Benefits : रसगुल्ला आरोग्यासाठी खूप फायदेशीर 


जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा तुमच्या आरोग्याला नक्की फायदा होईल. 100 ग्रॅम रसगुल्ल्यामध्ये 153 कॅलरीज कार्बोहायड्रेट्स, 17 कॅलरीज फॅट आणि 16 कॅलरीज प्रोटीन असतात. रसगुल्ल्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टोअसिड आणि केसीन असते. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो.


Rasgulla Health Benefits For Eyes : डोळ्यांसाठीही उत्तम


रसगुल्ल्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम देखील असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.रसगुल्ला खाण्यामुळे डोळ्यांसंबंधित आजारही दूर होतात. रसगुल्ला खाल्ल्यामुळे डोळ्यांची जळजळ दूर होते आणि पिवळेपणाही दूर होतो. 


Rasgulla Health Benefits : यकृतासाठी फायदेशीर


कमी कॅलरीज असलेल्या मिठाईमध्ये रसगुल्ल्याचा समावेश होतो. रसगुल्ला रिकाम्या पोटीही खाऊ शकतो. काविळीच्या रुग्णांनी रोज सकाळी रसगुल्ला खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. रिकाम्या पोटी रसगुल्ली खाल्ल्याने यकृताला आराम मिळतो.


Rasgulla Health Benefits : जळजळपासून आराम


रसगुल्ला खाल्ल्याने लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो. रसगुल्ल्याचे सेवन केल्यामुळे स्नायूंची ताकद टिकून राहण्यास मदत होते. पण, मधुमेही रुग्णांनी रसगुल्ल्याचे सेवन करू नये.


Rasgulla Health Benefits For Pregnancy : गरोदरपणात प्रभावी


रसगुल्ला खाणं गरोदरपणात प्रभावी ठरु शकतं. पण, गर्भवती महिलांनी दररोज दोनपेक्षा जास्त रसगुल्ले खाऊ नयेत. यामुळे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असतो. त्याशिवाय रसगुल्ला खाताना तो पूर्ण पिळून त्यातील पाक काढूनच खावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health Tips : खूप चिडचिड होतेय आणि राग येतोय? व्हिटॅमिन्सच्या कमतरता असू शकतं कारण, 'या' पदार्थाचा आहारात समावेश कर