How To Know Dog Has Rabies: लांब राहा कुत्रा चावेल, इंजेक्शन घ्यावे लागतील, हे वाक्य तुम्हीही लहानपणी नक्की ऐकलं असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का? कुत्रा चावल्यानंतर किती वेळात रेबीजचं इंजेक्शन (Rabies Injection) घ्याव लागतं? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील, जाणून घेऊयात सविस्तर. 


रेबीज (Rabies Symptoms) हा जेवढा घातक आजार आहे, तेवढाच जीवघेणाही आहे. साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे की, कुत्रा चावल्यानं रेबीज होतो. रेबीज हा न्यूरोट्रॉपिक लिसावायरस किंवा रॅबडोविरिडे नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. रेबीजवर कायमस्वरूपी उपचार नाही. मात्र वेळीच निदान झाल्यास हा आजार आटोक्यात ठेवता येतो. लसीकरणाच्या मदतीनं रेबीजवर नियंत्रण मिळवता येतं. पण जर एखाद्या व्यक्तीला लस मिळाली नसेल तर अशा परिस्थितीत रेबीजचा संसर्ग पसरू शकतो आणि हा संसर्ग हळूहळू जीवघेणा ठरू शकतो. 


रेबीज झालेला कुत्रा चावल्यास एखादी व्यक्ती आजारी पडू शकते का? 


जर तुम्ही कुत्र्याला त्रास दिला किंवा कुत्र्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, तर कुत्रा चावतो. याव्यरिक्त रेबीजच्या आजारामुळे कुत्रा पिसाळतो. तो इथे-तिथे भटकू लागतो. दिसेल त्याला चावत सुटतो. पण अशावेळी तात्काळ काही उपाय करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, कुत्रा चावल्यानंतर जर रेबीज झालेला कुत्रा चावला आणि त्यामुळे तुम्हालाही रेबीजचा संसर्ग झाला तर जीवही जाऊ शकतो. 


कुत्र्याला रेबीज झाल्याची लक्षणं 


तुमच्या घरात कुत्रा असेल किंवा एखादा भटका कुत्रा असेल, तर त्याला रेबीज झालंय हे तुम्ही कसं ओळखाल? कुत्र्यामध्ये काही लक्षणं दिसतात. ती तुम्ही वेळीच ओळखलीत तर, तुम्हाला सावध राहणं सोपं होतं. जाणून घ्या कोणती लक्षणं दिसतात... 



  • कुत्रा अधिक चिडचिडा होतो 

  • विनाकारण कुत्रा इथे तिथे भटकतो किंवा पळत राहतो

  • कुत्र्याच्या तोंडातून लाळ येत राहते

  • कुत्रा सुस्तावतो आणि एका वेळेनंतर त्याचा मृत्यू होतो 


कुत्रा चावल्यानंतर कधी आणि किती लसी घेणं आवश्यक?


कुत्रा चावल्यास दोन प्रकारच्या लस दिल्या जातात. पीडित व्यक्तीला तीन इंजेक्शन्स घ्यावे लागतात. त्यातील पहिलं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर लगेच घेतलं जातं. म्हणजेच, कुत्रा चावल्यावर त्याच दिवशी पहिलं इंजेक्शन घेतलं जातं. तर दुसरं इंजेक्शन 3 दिवसांनी आणि तिसरं इंजेक्शन 7 दिवसांनी घेतलं जातं.


तज्ज्ञांच्या मते, लसीकरण करणं आवश्यक, अन्यथा प्राणांना मुकाल 


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कुत्रा पाळण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी त्या कुत्र्याचं लसीकरण करुन घ्या. किंवा तु्म्ही एखाद्या दुसऱ्या शहरात जाणार असाल आणि तिथे रेबीज झालेल्या कुत्र्यांची संख्या अधिक असेल तर तिथे जाण्यापूर्वी इंजेक्शन घेणं आवश्यक आहे. 


रेबीज झालेल्या व्यक्तीमध्ये कोणती लक्षणं दिसतात? 


रेबीज हा एक आजार आहे जो विषाणूंद्वारे पसरतो. जर एखाद्या प्राण्याला या आजाराची लागण झाली आणि तो माणसाला चावला तर त्या व्यक्तीलाही हा विषाणू पसरतो आणि नंतर वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होतो. जर आपण या आजाराच्या लक्षणांबद्दल बोललो तर रेबीज झाल्यानंतर तुम्हाला शरीरात तीव्र वेदना जाणवतात. याबरोबरच संपूर्ण शरीरात थकवा जाणवू लागतो आणि तुम्हाला ताप येऊ लागतो. जेव्हा ही स्थिती अधिक गंभीर होते, तेव्हा रुग्ण हवा आणि पाण्याला घाबरतो आणि नेहमी अंधारात राहण्याचा प्रयत्न करतो. तो विचित्र आवाज काढू लागतो.


24 तासांच्या आत इंजेक्शन घेणं गरजेचं 


कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणं फार महत्वाचं आहे. कुत्रा चावल्यास पाच इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पहिले इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत, दुसरं इंजेक्शन तिसऱ्या दिवशी, तिसरं इंजेक्शन सातव्या दिवशी आणि चौथं इंजेक्शन 14 व्या दिवशी आणि शेवटचं म्हणजेच पाचवं इंजेक्शन 28 व्या दिवशी दिलं जातं.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुंबईच्या डॉक्टरांना मोठं यश, कॅन्सरशी दोन हात करण्यासाठी शोधली खास थेरपी