Post Covid Memory Problem : जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीने अनेकांचे आयुष्यात दहशत निर्माण केली. काहींना कोरोनाच्या रूपात तर काहींची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली. पण काही लोकांना कोरोनाच्या भयंकर परिणामांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सांधे दुखणे, स्मरणशक्ती कमजोर होणे आणि डोळ्यांवर होणारे गंभीर परिणाम यांचा समावेश होतो. स्मरणशक्तीशी संबंधित निर्माण झालेल्या समस्या जाणून घ्या.
कोरोनामुळे कोणत्या लोकांना स्मरणशक्तीची समस्या आहे?
कोविड-19 चे बळी ठरलेल्या, कोरोना संसर्गादरम्यान वास घेण्याची क्षमता गमावलेल्या लोकांमध्ये स्मरणशक्तीशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. पोस्ट कोरोना इफेक्ट्सवरील वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये, हे समोर आले आहे की, काही काळासाठी वास न येणे हे अल्झायमर रोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. संशोधनात मिळालेल्या तथ्यांच्या आधारे हे देखील समोर आले आहे की, कोरोनामुळे लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यापैकी दीर्घकाळ टिकणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्या देखील लोकांना त्रास देत आहेत. जसे की, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या.
संशोधनात 'या' गोष्टी समोर आल्या
न्यूरोलॉजिकल आरोग्यावर कोरोनाचा प्रभाव आणि स्मरणशक्तीशी संबंधित बदलांचा अभ्यास करताना, अर्जेंटिनाच्या पॉन्टिफिकल कॅथोलिक विद्यापीठातील शास्त्रज्ञांना असे आढळून आले की कोरोनाची लागण झालेल्या दोन तृतीयांश लोकांमध्ये स्मरणशक्तीचा काही प्रकार आहे. कोणाला गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होत असेल तर कोणाला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तर काही लोकांच्या मनात सतत काहीतरी सुरू असल्याची समस्याही समोर आली आहे. या दोन-तृतीयांशांपैकी निम्म्या लोकांना न्यूरोलॉजिकल समस्या इतक्या गंभीर अवस्थेत आहेत की त्यांना त्यांची दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :