Pneumonia : 'न्यूमोनिया' हा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. अगदी लहान मुले व ज्येष्ठ मंडळींना न्युमोनियाचा सर्वाधिक धोका असतो.व्हायरल न्यूमोनिया हा फुफ्फुसात होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्यामध्ये फुफ्फुसांना सूज येते. इन्फ्लूएन्झा, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) आणि कोरोनाव्हायरस सारखे सामान्य विषाणू व्हायरल न्यूमोनियास कारणीभूत ठरु शकतात. व्हायरल न्यूमोनियाशी संबंधित लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते कारण ती  सामान्यतः सर्दी किंवा फ्लूसारखीच असतात. यामध्ये कोरडा खोकला, ताप, छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, दम लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि जास्त घाम येणे यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक करत ही लक्षणे श्वसनाच्या गंभीर समस्यांमध्ये बदलतात. दीर्घकालीन आरोग्य स्थिती, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, धूम्रपान आणि वाढत्या वयामुळे विषाणूजन्य न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. व्हायरल न्यूमोनियासाठी लसीकरण केल्याने तुम्ही सुरक्षितता राहता तसेच रोगास प्रतिबंध करता येऊ शकते. यासाठी लसीकरणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


व्हायरल न्यूमोनियासाठी लस


न्युमोकोकल कॉज्युगेट व्हॅक्सिन (Pneumococcal conjugate vaccine) : ही लस न्यूमोनिया, कानाचे संक्रमण आणि मेंदुज्वर यासारख्या रोगांचा सामना करण्यासाठी वापरली जाते. ही लस मुख्यतः मुलांसाठी वापरली जाते मात्र, व्हायरल न्यूमोनिया विकसित होण्याचा उच्च धोका असलेल्या प्रौढांसाठी देखील या लसीचा वापर केला जाऊ शकतो. ही लस रोगप्रतिकारक शक्तीला न्यूमोकोकल बॅक्टेरियाशी प्रभावीपणे लढण्यास मदत करते आणि लक्षणांची तीव्रता कमी करते. साधारणपणे, लहान मुलांना त्यांच्या जन्मानंतर पहिल्या दोन वर्षांत या लसीचे चार शॉट्स मिळतात. कोमॅार्बिडीटी असलेल्या आणि 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना पीसीव्ही लसीचा एकच डोस घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
पॉलिसॅकेराइड न्यूमोकोकल लस (PPSV): ही लस न्यूमोकोकल बॅक्टेरियाच्या पॉलिसेकेराइड (शुगर्स) सह बनविली जाते. लहान मुलांमध्ये विषाणुजन्य न्युमोनिया, तर प्रौढांमध्ये जिवाणुजन्य न्युमोनियाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच प्रौढांनी न्युमोकोकल लस दर पाच वर्षांनी व फ्लू लस दरवर्षी घेणे हिताचे ठरते. व्याधीग्रस्त व्यक्तींनी तर दोन्ही लशी आवर्जून घेणे अतिशय गरजेचे आहे.प्रामुख्याने 65 आणि त्याहून अधिक वयोगटासाठी या लसीची शिफारस केली जाते. किडनीचे आजार, दमा, सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज), मधुमेह आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी पीपीएसव्ही लसीकरण करता येते. हे सामान्यतः सुरक्षित असते आणि इंजेक्शन दिलेल्या भागात लालसरपणा, जळजळ आणि वेदना यांसारखे किरकोळ दुष्परिणाम दिसून येतात. पीपीएसव्ही लस ही सहसा लहान मुलांसाठी वापरली जात नाही. हे या प्राणघातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सक्रियपणे ऍन्टीबॉडीज तयार करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते. शरीरातील न्यूमोकोकल बॅक्टेरियाच्या विशिष्ट जातींच्या व्यापकतेनुसार या लसीची परिणामकारकता व्यक्तीपरत्वे बदलू शकते.
 
इन्फ्लूएंझा लस: ही लस सुरुवातीला इन्फ्लूएंझा, एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी वापरली जाते ज्यामुळे न्यूमोनिया देखील होऊ शकतो. उच्च-जोखीम गट जसे की गर्भवती महिला, 6 महिने ते 8 वर्षे वयोगटातील मुले, 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना आणि कोमॅार्बिडीटीज असलेल्या व्यक्तींना विषाणूजन्य न्यूमोनियाची शक्यता कमी करण्यासाठी लसीकरण केले जाते.


- डॉ. समीर गर्दे, फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक, ग्लेनईगल्स हॉस्पिटल


इतर महत्वाच्या बातम्या 


नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य