गंभीर आणि जुन्या यकृताच्या (liver) आजारांनी, जसे फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिसने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांसाठी पतंजलीचा वेलनेस प्रोग्राम आशेचा किरण बनून समोर आला आहे, असा दावा पतंजलीनं केला आहे. वेलनेस सेंटरमध्ये आलेल्या अनेक रुग्णांनी अनेक ठिकाणी उपचारातून निराशा मिळाल्यानंतर आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार यांचा आधार घेतला आणि चमत्कारिक फायदे मिळवले, असं पतंजलीनं म्हटलं आहे.

Continues below advertisement


लिव्हर सिरोसिसच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये यश - पतंजली


लिव्हर सिरोसिस, ज्याला जगभरात एक जटिल आणि असाध्य रोग मानले जाते, अशा रुग्णांनी पतंजली वेलनेसमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अनुभवल्या आहेत. पतंजलीचा दाव्यानुसार, पश्चिम बंगालच्या निशा सिंग नावाच्या महिलेने सांगितले की, तिला 15-16 वर्षांपासून लिव्हर सिरोसिसचा त्रास होता आणि डॉक्टरांनी लिव्हर प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. परंतु, पतंजलीमध्ये केवळ 10 दिवसांच्या उपचारानंतर तिचा 15 वर्षांपासूनचा जुनाट आजार बरा झाला आणि ती पूर्णपणे समाधानी आहे.


आयुर्वेदिक औषधे आणि योगामुळे व्हायरल लोड सामान्य झाला - पतंजली


''महाराष्ट्राचे ज्ञानेश्वर विठ्ठलराव पाटील लिव्हर सिरोसिसच्या उपचारासाठी दुसऱ्यांदा पतंजलीमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांनी, आयुर्वेदिक औषधे, प्राणायाम आणि काढ्याचे सेवन केल्याने त्यांचा व्हायरल लोड जो 12 लाखांपेक्षा जास्त होता, तो आता पूर्णपणे सामान्य झाला आहे.'' असं पतंजलीकडून सांगणयात आलं आहे.


''पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी पवन कुमार गुलाटी यांना डॉक्टरांनी लिव्हर प्रत्यारोपणाची तयारी करण्यास सांगितले होते. परंतु, पतंजलीमध्ये डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, त्यांना लिव्हर सिरोसिसचा कोणताही आजार नाही आणि त्यांची पचनसंस्था पूर्णपणे ठीक आहे.'' , अशी माहिती पतंजलीकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील नोएडाचे रहिवासी तेज नारायण मिश्रा यांना 2013 मध्ये लिव्हर सिरोसिसचा आजार झाला होता. एलोपॅथीमध्ये आराम न मिळाल्यावर, त्यांनी योग कार्यक्रम पाहून योग-प्राणायाम सुरू केला आणि नंतर पतंजली वेलनेसमध्ये आले, ज्यामुळे त्यांना पूर्ण आरोग्य लाभ मिळाला.''


पतंजलीच्या उपचार पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये :  


पतंजलीचा दावा आहे की, वेलनेसमध्ये या रोगांच्या उपचारात एक समग्र दृष्टिकोन वापरला जातो.


थेरेपी: गरम-थंड शेक, पोटावर पट्टी, गरम पाद स्नान, मातीचा लेप, पिंडली लपेट आणि धूप स्नान यासारखे उपचार दिले जातात.


योगासने: भुजंगासन, मर्कट आसन, शवासन, वक्रासन, गोमुखासन आणि मंडुकासन यासारखी आसने प्रामुख्याने समाविष्ट आहेत.


प्राणायाम: कपाल भाती आणि अनुलोम विलोम जवळजवळ सर्व रुग्णांच्या उपचारात समाविष्ट होते.


आहार:रुग्णांना फलाहार, कच्चा कल्प, मलनाशक आहार, उकडलेले अन्न आणि उपवास चिकित्सा घेण्याचा सल्ला देण्यात आला.