Covid 19 : ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) नवीन प्रकाराची भीती सतत वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारने अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यूही लावला आहे. तथापि, ओमायक्रॉनपासून संरक्षण मिळवण्यासाठी, आपण आपल्या आरोग्याची आणि आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फक्त मजबूत प्रतिकारशक्ती तुम्हाला ओमायक्रॉनचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकते. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग टाळू शकता. जाणून घेऊया या टिप्सबद्दल...
व्हिटॅमिन डी
कोरोना व्हायरसच्या सर्व प्रकारच्या व्हेरियंटशी लढण्यात रोगप्रतिकारशक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक मानले जाते. त्यामुळे अशा पदार्थांना आहाराचा भाग बनवा, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्ही रोज अर्धा तास कोवळ्या उन्हात बसू शकता. कारण सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.
जंक फूडला बाय म्हणा!
जंक फूडमुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते आणि आपण आजारीही पडू शकतो. कोरोनाच्या काळात आजारी पडणे कोणत्याही धोक्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन करू नये. तुम्हीही जंक फूडचे शौकीन असाल, तर आजच ते तुमच्या आहारातून वगळा.
व्हिटॅमिन सी आणि झिंक
व्हिटॅमिन सी आणि झिंक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यासाठी तुम्ही लसूण, आले, गरम मसाला, हळद, मध, तुळस, संत्री, लिंबू इत्यादींचे सेवन करू शकता.
जास्तीत जास्त पाणी प्या
पाणी सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. त्याच वेळी, ओमायक्रॉन टाळण्यासाठी अधिक पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अधिक पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Health Care Tips : सर्दीसोबतच कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग, आहारात ‘हे’ सुपरफूड नक्की सामील करा!
- CoWin Portal News : कोविन पोर्टलवरून डेटा लीक? आरोग्य मंत्रालयाकडून महत्वाची माहिती... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..
- Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha