Omicron Variant : देशभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. राज्यात आज ओमायक्रॉन व्हेरियंटच्या 86 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2845 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1454 रुग्ण हे बरे झाले आहेत. ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. काही लोकांना मात्र ओमायक्रॉनचा धोका जास्त असतो. ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असल्याचे सांगितले जात आहे परंतु या विषाणूमध्ये वेगाने पसरण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ज्या वेगाने कोरोनाचे नवीन प्रकार समोर येत आहेत, त्याच वेगाने त्याची लक्षणेही बदलत आहेत.
'या' लोकांना ओमायक्रॉनचा धोका जास्त
वृद्धांना धोका असतो : ओमायक्रॉन कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. पण वृद्ध लोकांना ओमायक्रॉनचा त्रास जास्त होतो. कारण वृद्धापकाळात आरोग्याच्या अनेक समस्या असतात. रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोकादेखील वाढतो.
हृदयरोग्यांसाठी धोका : ज्या लोकांना हृदयविकाराचा सामना करावा लागतो त्यांना ओमायक्रॉनचा धोका सर्वाधित असतो. त्यामुळे कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे.
श्वसनाचे आजार असलेले लोक : कोरोना व्हायरस हा श्वसनाचा आजार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना आधीपासूनच श्वसनाचा आजार आहे त्यांना ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे.
ज्या लोकांनी लस घेतली नाही : ज्या लोकांना अद्याप लस घेतली नाही त्यांना ओमायक्रॉनचा धोका जास्त आहे.
संबंधित बातम्या
Garlic Side Effects : लसूण खायला आवडते? आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम..
Health Tips : थंडीच्या काळात घशाची खवखव दूर करेल मिठाचा चहा, जाणून घ्या याचे फायदे..
Stealth Omicron : धोका वाढताच! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा स्ट्रेन 'स्टिल्थ ओमायक्रॉन', 'या' बाबी जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha