Covid-19 : कोविड -19 चा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन (omicron) खूप वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. यासाठी तुम्ही स्वतःला निरोगी ठेवणे आणि कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुम्ही दररोज वापरत असलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल. हातांसोबतच मोबाईलची स्वच्छताही खूप गरजेची आहे. पण स्मार्टफोन साफ ​​करताना किंवा सॅनिटाइज करताना तुम्हाला अनेक खबरदारी घ्यावी लागेल. आता, आम्ही तुम्हाला स्मार्टफोन कसा स्वच्छ करायचा ते सांगणार आहोत. 


मोबाईल सॅनिटाईझ करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा



  •  मोबाईलची स्क्रीन अतिशय नाजूक असते. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणतेही ओरखडे टाळण्यासाठी नेहमी लिंट-फ्री मायक्रोफायबर कापड वापरावे.

  • तुम्ही तुमच्या स्मार्टफोन आणि टॅबलेटवर विंडो क्लीन्सर किंवा क्लिनिंग सॉल्व्हेंट्स कधीही वापरू नका. यामुळे तुमचे डिव्हाइस खराब होऊ शकते.

  • अल्कोहोल-आधारित द्रावण वापरण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीनगार्ड असल्याची खात्री करा.


स्मार्टफोन योग्य प्रकारे स्वच्छ करण्याची प्रक्रिया



  • डिव्हाइस बंद करा.  निर्जंतुकीकरण करताना ते चालू ठेवू नका.

  • स्क्रीनवरील घाण पुसण्यासाठी लिंट-फ्री मायक्रोफायबर कापड डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंत वापरा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha