Benefits of Salt Tea: मिठाचा चहा अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मिठाचा चहा (Salt Tea) घेतल्याने घशाची खवखव दूर होते. तर, मीठ घालून चहाचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा वाढते, डोकेदुखीची समस्या दूर होण्यासह इतर अनेक फायदे शरीराला मिळतात. त्याचबरोबर मिठाच्या चहाची चव तर जबरदस्त असतेच, पण थंडीत हा चहा प्यायल्याने शरीराला ऊबही मिळते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला मिठाचा चहा पिण्याचे फायदे सांगणार आहोत. यासोबतच तो कसा बनवला जातो याची रेसिपीही जाणून घेणार आहोत.


मिठाचा चहा कसा बनवला जातो?


मिठाचा चहा बनवण्यासाठी चहाची पावडर, मीठ आणि साखर इतकेच साहित्य आवश्यक आहे. तुम्ही साखरेशिवाय देखील हा चहा बनवू शकता. ब्लॅक टी पिणार असाल तर, हा चहा दुधाशिवायही बनवता येतो. मिठाचा चहा बनवण्यासाठी पाण्यात चहा पावडर, मीठ आणि साखर घालून, मिश्रण व्यवस्थित उकळवा. चहा उकळल्यानंतर कपमध्ये काढून गरम चहा सेवन करा. हवे असल्यास यात दूध देखील घालू शकता.


मिठाचा चहा पिण्याचे फायदे


डोकेदुखी दूर होते : मिठाचा चहा प्यायल्याने डोकेदुखी दूर होते. जर, तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही मिठाचा चहा बनवून पिऊ शकता.


रोगप्रतिकारशक्ती वाढते : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी मीठयुक्त चहाचे सेवन फायदेशीर मानले जाते. मीठ टाकून चहा प्यायल्यास अनेक हंगामी आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.


घशातील खवखव दूर होते : मिठाचा चहा प्यायल्याने सर्दी, पडसे, घशातील कफ यांची समस्या दूर होते. दुसरीकडे, जर तुम्ही एक कप मिठाचा चहा प्यायला, तर तुमच्या घशात जमा झालेला कफ देखील बाहेर येईल आणि सर्दी निघून जाईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha