Coronavirus New Symptoms : ओमायक्रॉन आणि कोरोना विषाणूची संख्या जसजशी वाढतेय तसतशी अनेक नवीन लक्षणेदेखील समोर येत आहेत. कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये आतापर्यंत अशा 20 लक्षणांचा समावेश होता. या लक्षणांमध्ये असे आढळून आले आहे की नवीन Omicron व्हायरस तुमच्या मेंदू, डोळे आणि हृदयावर परिणाम करतो. ब्रिटनमधील एका रिपोर्ट्सनुसार, कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 20 लक्षणांबद्दलही सांगण्यात आले आहे. परंतु, आता कोरोनाचे आणखी एक नवीन लक्षण समोर आले आहे. यामध्ये कोरोना तुमच्या कानावर हल्ला करत आहे. ओमायक्रॉनची ही नवीन लक्षणे अनेकदा लस घेतलेल्या लोकांमध्ये दिसतात. 


ओमायक्रॉनची नवीन लक्षणे :



  • कानात दुखणे

  • कानात तीक्ष्ण मुंग्या येणे

  • कानात बेल आणि शिट्टी वाजल्यासारखी वाटणे.


ही लक्षणे जरी गंभीर असली तरी वेळीच उपचार सुरू केल्यास ही समस्या लवकर बरी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या प्रकारच्या कानाच्या समस्येने पिडीत लोकांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान, असे आढळून आले की, अनेक रुग्ण ज्यांना कानात वेदना आणि मुंग्या येणे यांसारखी लक्षणे जाणवत होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला ऐकण्यात त्रास होत असेल, कानाला सतत मुंग्या येत असतील किंवा चक्कर येण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला हे लक्षण जाणवल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ताबडतोब कोविडची चाचणी करून घ्या. 


याशिवाय अनेक संशोधनांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की ज्या लोकांच्या आतड्यांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळत आहेत, त्यांना पोटदुखीची लक्षणे जाणवत आहेत. म्हणजेच ओमायक्रॉन तुमच्या नाक आणि तोंडाऐवजी आतड्यातही लपलेले असू शकते. अनेक वेळा अशा लोकांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह येतो. म्हणजेच, कोरोनाचा नवीन व्हेरियंट तुमच्या कोणत्याही अवयवांवर परिणाम करू शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha