Health Research : मुंबई : जर तुम्हाला वाटत असेल की, केवळ भावना (Emotions) किंवा मग एखाद्या घटनेमुळेच तुमच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) परिणाम होत असेल, तर तुमचा हा गैरसमज आहे. कारण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जो आहार घेता, त्या गोष्टींचाही तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. जर चुकीचं डाएट फॉलो केलं, तर त्याचाही परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. काही खाद्यपदार्थांचा समावेश डाएटमध्ये केल्यानं तुमचा मूड आणि तुमच्या वागण्यावर परिणाम होतो. बरं अनेकदा हा परिणाम काही काळापुरता नाही, तर आयुष्यभरासाठीही होतो. एका संशोधनातून हे समोर आलं आहे. 


नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इंफॉर्मेशनवर 2020 मध्ये एक संशोधन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये डाएट आणि डिप्रेशनची लक्षणं आणि त्यांचा मानसिक आरोग्याशी संबंध याचा अभ्यास करण्यात आला होता. डाएटमध्ये अनहेल्दी पदार्थांचा समावेश केल्यानं त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो, असा धक्कादायक निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. अनहेल्दी डाएटमुळे व्यक्ती नेहमी दुःखी राहते, सतत चिडचिड करते, एवढंच नाहीतर राग तर तास त्यांच्यासोबतच असतो.


संशोधनात काही पदार्थांचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोणते पदार्थ ते जाणून घेऊयात... 




फळांचा रस (Fruit Juice)


फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. फळांमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यासोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. अनेकदा डॉक्टर्सही फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. पण फळांचा ज्यूस तुमचं मानसिक आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. फळांच्या ज्यूसमध्ये फायबर व्यतिरिक्त काही पोषक घट असतातच, पण त्यासोबतच साखर आणि पाणीही असतं. ज्यामुळे ब्लड शुगर वाढते आणि जेव्हा ही शुगर कमी होते, त्यावेळी खूप भूक लागते आणि त्यामुळे चिडचिड होण्यास सुरुवात होते. 



ब्रेड टोस्ट (Bread Toast)


बहुतेक लोक नाश्त्यात व्हाईट ब्रेड टोस्ट खातात. ब्रेडचा समावेश प्रोसेस्ड फूडमध्ये होतो. प्रोसेड फूडमध्ये हाई फ्रुक्टोज असतं. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व अत्यंत कमी असतात. याचं सेवन केल्यानं डायबिटीजचा धोका अधिक वाढतो. ब्रेडच्या सेवनानं यातील साखर लगेच रक्तात विरघळते आणि त्यानंतर जेव्हा ग्लुकोज कमी होतं, त्यावेळी मूड स्विंग्स, मूड खराब होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. 


टोमॅटो केचअप (Tomato Ketchup)


टोमॅटो केचअप म्हणजे, स्नॅक्ससोबतचा साथी... जंकफूडसोबत टोमॅटो केचअप पेअर करुन खाल्ला जातो. लहानग्यांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत टोमॅटो केचअप सर्वांनाच आवडतो. टोमॅटो केचअपची क्रेझ इतकी आहे की, काहीजणांना अगदी जेवतानाही तो हवाच असतो.  बाजारात उपलब्ध असलेल्या टोमॅटो केचपमध्ये साखर आणि कृत्रिम घटक असतात. अशा टोमॅटो केचअपचं दररोज सेवन केल्यानं त्याचा आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मानसिक आरोग्यासाठी टोमॅटो केचअप अत्यंत घातक असून यामुळे व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणं दिसू शकतात.


मद्यपान


मद्यपान शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. मद्यपान केल्यानं त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे तुमची मनःस्थिती आणि विचार करण्याची क्षमता नष्ट होते. ज्यामुळे व्यक्तीमध्ये चिडचिड करणं, खूप राग येणं यांसारखी लक्षणं दिसतात. दिवसागणिक ही लक्षणं वाढू लागतात. 


सोडा


सोडा फक्त रक्तातील साखर वाढवण्याचं काम करतो. त्यात कोणत्याही प्रकारचे पोषक घटक नसतात. याचे नियमित सेवन केल्यानं मानसिक आरोग्याला मोठं नुकसान होऊ शकतं.