Mpox : जगातील विविध देशांमध्ये मंकीपॉक्सचा कहर वाढत चाललाय. एका देशातून दुसऱ्या देशात याच्या संसर्गाची वाढती प्रकरणे नोंदवली जात आहेत. आफ्रिकन देशांमध्ये, विशेषत: काँगोमध्ये याच्या संसर्गाच्या वाढीनंतर आता त्याचा परिणाम इतर देशांवरही होताना दिसत आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अलीकडील अहवालानुसार, पाकिस्तान आणि स्वीडनमध्येही या संसर्गजन्य रोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी या वाढत्या धोक्याबाबत सर्व लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.



भारतही सतर्क


शेजारी देश पाकिस्तानमध्ये संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर भारतही सतर्क झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य संचालनालयाने (DPH) विमानतळ आणि समुद्री बंदर अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँगो आणि मध्य आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मंकीपॉक्स संसर्गासाठी पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतेक रुग्णांची हिस्ट्री आहे, म्हणजेच अशा लोकांनी अलीकडेच अशा देशांमध्ये प्रवास केला होता, जेथे हा संसर्ग वेगाने वाढत आहे.


 


अधिकाऱ्यांना सूचना दिल्या


सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी (DHOs), विमानतळ, चेन्नई, मदुराई आणि कोईम्बतूर येथील आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य संचालक टी.एस. सेल्वविनायगम यांनी mpox च्या जोखमींबद्दल सतर्क केले आहे. बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्याच्या आणि गेल्या 21 दिवसांच्या प्रवासाची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2022 मध्ये पहिल्यांदाच भारतात संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली होती. 2022 पासून देशात विषाणू संसर्गाची 30 प्रकरणे नोंदली गेली आहेत.



भारतात किती धोका आहे?


वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या भारतात मंकीपॉक्स संसर्गाचा धोका खूपच कमी आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही. हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू असल्याने आणि शेजारच्या देशांत पोहोचला असल्याने अगोदरच सतर्क राहणे गरजेचे आहे.


मिळालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा लवकरच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात.


 


मंकीपॉक्सबद्दल सात मुद्द्यांमध्ये सविस्तरपणे समजून घेऊ.


MPox ही अनेक दशकांपासून आफ्रिकेच्या काही भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. 1970 मध्ये काँगोमध्ये मानवांमध्ये पहिला रुग्ण नोंदवला गेले. सध्या, काँगोमध्ये संसर्गाची 27,000 रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत. जानेवारी 2023 पासून येथे 1,100 हून अधिक मृत्यू झाले आहेत.


दोन वर्षांपूर्वी डब्ल्यूएचओने यूएस आणि आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये वेगाने पसरणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर MPOX ला आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. यावेळीही वाढत्या धोक्यांमुळे १४ ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.


Mpox संसर्ग धोकादायक आणि घातक मानला जातो. या संसर्गाची अधिक प्रकरणे मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये दिसून येतात.


संसर्गाची अधिक रुग्णसंख्या प्रामुख्याने समलिंगी आणि उभयलिंगी लोकांमध्ये दिसून आली आहेत. लैंगिक संबंधांव्यतिरिक्त, इतर अनेक मार्गांनी संसर्ग होण्याचा धोका असू शकतो, ज्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.


संक्रमित व्यक्तीच्या लैंगिक संपर्कातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याचा धोका असतो.


संक्रमित लोकांच्या त्वचेवर लिम्फ नोड्सच्या सूज आणि तापासह मोठे फोड येऊ शकतात. याची अगदी सौम्य लक्षणेही प्राणघातक ठरू शकतात.


युनायटेड स्टेट्स अन्न आणि औषध प्रशासनाने 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये गंभीर mpox प्रकरणांसाठी ZnNeOS (ज्याला Imvammune किंवा Imvanex म्हणूनही ओळखले जाते) नावाची स्मॉलपॉक्स लस मंजूर केली आहे.


 


 


हेही वाचा>>>


MPox : आधी आफ्रिका.. मग पाकिस्तान...आता भारत? MPox ने अवघ्या जगाची झोप उडवली! भारतासाठीही धोक्याची घंटा? 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )