Monsoon Hair Care : देशासह महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय, पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणासोबत अनेक आजारांच्या समस्या देखील वाढतात. या सोबतच पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्याही वाढतात. अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो. पावसाळ्यात केसांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते, ज्याबद्दल अनेकांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या वाढतात
पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात. या दिवसात हवेत ओलावा असतो, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा होणे किंवा केस गळणे अशा समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत, या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकता आणि त्यांच्याशी संबंधित सर्व समस्या टाळू शकता. जाणून घ्या..
तेल लावायला विसरू नका
पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे. केसांची मुळे मजबूत करण्याचा हा उत्तम उपाय आहे आणि स्कॅल्पही निरोगी ठेवतो. यासाठी रात्री तेलाने मसाज करा आणि सकाळी चांगल्या शाम्पूने केस धुवा.
कंडिशनर वापरा
हवेतील जास्त आर्द्रतेमुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात. अशा परिस्थितीत शॅम्पूनंतर कंडिशनर करणं सोडू नका, कारण ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण कंडिशनिंग केल्याने केस फ्रिज राहत नाही तर केसांना कोरडेही होत नाहीत.
ओले केस विंचरू नका
अनेकांना फक्त ओले केस विंचरण्याची सवय असते. अशा परिस्थितीत, तुम्ही कितीही घाई करत असलात तरी, हे करणे टाळा, कारण यामुळे केसांतील भांग कमकुवत होतात आणि केस गळतीला अधिक चालना मिळते.
मायक्रो टॉवेल वापरा
केवळ तेल लावणे, केस धुणे किंवा कंडिशनिंग आवश्यक नाही तर केस गळण्यात तुमचा टॉवेल देखील मोठी भूमिका बजावतो. होय, जर तुम्ही ओले केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेल वापरत असाल तर तुम्ही हे देखील टाळले पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मायक्रो टॉवेलचा वापर तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. हे केस कोरडे आणि अडकण्यापासून वाचवते.
हेही वाचा>>>
Monsoon Care : आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आल्हाददायक हवामानासोबत आरोग्याची आव्हानंही, आजारपणा नको तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )