मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना प्रत्येक गोष्टीची घाई असते. काम असेल वा खाणं, सगळ्या गोष्टी सुपरफास्ट झाल्याचं दिसून येतंय. लोकांच्या खाण्याच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. कामासाठी बहुतांश वेळ घराबाहेर असल्याने फास्ट फूड हे लोकांच्या रोजच्या सवयींचा भाग झाला आहे. त्यामुळे पिझा, बर्गर, नुडल्स अशा अनेक खाण्याच्या गोष्टींवर भारतीय भर देताना दिसत आहेत. या फास्ट फूडच्या यादीत अलिकडे मोमोजची भर पडली असून ते अनेकांच्या पसंतीचे खाद्य झालं आहे. पण या मोमोज खाण्याचे आपल्या आरोग्यावर कोही नकारात्मक परिणामही होऊ शकतो. 


लहान मुलांपासून ते वयोवृद्धापासून सर्वांनाच मोमोज खायला आवडतं. पण तेच मोमोज आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. फक्त मोमोजच नव्हे तर त्यासोबत मिळणारी चटणीही आपल्या आरोग्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. 


पोटाचा घेर वाढू शकतो, कोलेस्टोरॉलची वाढ होणार 


मोमोजमध्ये मैद्याचा वापर केला जातो. मोमोज खायला सॉफ्ट व्हावेत यासाठी त्याच्या मैद्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा वापर केला जातो. पण या स्टार्चमुळे आपल्या पोटाचा घेर मात्र वाढण्याची जास्त शक्यता आहे. त्याचसोबत मोमोज खाल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉल आणि ब्लड ट्रायग्लिसराईड म्हणजे बॅड कोलेस्टोरॉलची वाढ अधिक होते. यामुळे आपल्या शरीराला मात्र हानी पोहोचू शकते. 


पॅनक्रिजसाठी हानिकारक 


मोमोजला सॉफ्ट बनवण्यासाठी त्याच्या मैद्यामध्ये अॅजोडिकार्बोनामाईड आणि बेझॉईल पॅरॉक्साईडचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतात. आपल्या पॅनक्रिजसाठी ते अत्यंत हानिकारक असतात.


खराब पदार्थांचा वापर 


मोमोजच्या आतमध्ये भाज्या आणि चिकनचा वापर केला जातो. मग ते मोमोज जास्त कालावधीसाठी ठेवल्यास मात्र खराब होऊ शकतात. त्याचं सेवन केल्यास आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. चिकनमध्ये असलेल्या ईकोली बॅक्टेरियामुळे आपल्या शरीराला धोका पोहोचू शकतो. 


तिखट चटणी आरोग्याला हानिकारक 


अनेकांना मोमोजसोबत तिखट चटणी खायला आवडते. परंतु ही तिखट चटणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरु शकते. त्याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे पाईल्सचा त्रास सुरू होऊ शकतो. 


डायबेटिसचा धोका वाढू शकतो 


मोमोजमध्ये वापरण्यात येणाऱ्या अॅजोडिकार्बोनामाईड आणि बेझॉईल पॅरॉक्साईडमुळे आपल्या शरीरातील पॅनक्रिजला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे इन्शुलिन हार्मोनचे सिक्रेशन व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे डायबेटिसचा धोका वाढू शकतो. मोमोजचे अधिक सेवन केल्यास डायबेटिसचा धोका वाढण्याची शक्यता कितीतरी पटीने अधिक असते.