Male Sweat Attracts Womens : आपल्या सर्वांना घाम (Sweat) येतो. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे किंवा कडक उन्हात जास्त फिरल्यानं घाम (Male Sweat) येतो. जास्त काम किंवा व्यायाम (Exercise) करण्याने घाम भरपूर येतो. तसेच, काहीवेळा विशिष्ट औषधं (Medicines), मोनोपॉज (Menopause), स्थूलता (Obesity), रक्तातील साखर (Blood Suger) कमी झाल्यानं तसेच, थायरॉइडची (Thyroid) समस्या यामुळेही अतिघाम येण्याची समस्या उद्भवते. पण घाम शरीराचं तापमान कंट्रोल करण्याचंच नाहीतर, विरुद्ध लिंग असलेल्या व्यक्तीला आकर्षित करण्याचंह काम करतो. जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातून घामाबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. 


घाम केवळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचीच नाही, तर तो विरुद्ध लिंग (पुरुष/स्त्री) आकर्षित करण्यातही भूमिका बजावू शकतो. जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या संशोधनानुसार, इतर सजीवांप्रमाणेच मानवालाही घाम येतो. तसेच, इतर सजीवांप्रमाणे मानवाच्या घामाला एक विशिष्ठ प्रकारचा गंध येतो, ज्याचा विरुद्ध लिंगाच्या (पुरुष/स्त्री) व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो.


कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले येथील संशोधकांनी मानवी शरीराच्या घामाबाबत एक संशोधन केलं. त्या संशोधनातून असं आढळून आलं की, पुरुषांच्या घामामध्ये आढळणारा अँड्रॉस्टेडिएनोन (Androstadienone), हा विशेष घटक महिलांमध्ये कोर्टिसोलची पातळी वाढवतो. कॉर्टिसॉल हा तणाव संप्रेरक आहे, परंतु विशेष म्हणजे, स्त्रियांमध्ये त्याची वाढ, त्यांच्या मनःस्थितीवर आणि लैंगिक उत्तेजनावर देखील परिणाम करू शकते. 


संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो? 


संशोधन करण्यासाठी काही महिलांचा समावेश करण्यात आला. संशोधकांनी सहभागी झालेल्या महिलांना गंध घेण्यासाठी पुरुषांच्या घामातील एक केमिकल पदार्थ दिला. त्यानंतर संशोधकांना महिलांच्या रक्तात कोर्टिसोलची पातळी वाढल्याचं आढळून आलं. परिणामी, संशोधकांना असं आढळून आलं की, ज्या स्त्रियांनी पुरुषांच्या घामातील केमिकलचा गंध घेतला, त्यांच्यामध्ये कोर्टिसोलची पातळी गंध न घेतलेल्या महिलांच्या तुलनेत स्त्रियांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असते. 


संशोधन काय सांगतं? 


घामाबाबत करण्यात आलेल्या संशोधनात सहभागी झालेले संशोधक डॉ. क्लेअर व्हायर्ट म्हणतात की, हे संशोधन मानवांमध्येही गंधाद्वारे सिग्नल एक्सचेंज (Pheromone Communication) होत असल्याचा पुरावा आहे. उदाहरणार्थ, उंदीर आणि फुलपाखरांमध्ये, गंधाद्वारे सिग्नलची देवाणघेवाण होते आणि त्यांच्या वर्तनावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे, आमच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, मानवी गंध विरुद्ध लिंगावर देखील जैविक आणि कदाचित मानसिकदृष्ट्या प्रभाव टाकू शकतो.


अधिक संशोधन गरजेचं 


या संशोधनासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. तरीही, हा अभ्यास या वस्तुस्थितीकडे निर्देश करतो की, मानवी आकर्षण ही एक जटिल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गंध देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


Research Updates: तुमचा बॉस सारखी चिडचिड करतो, मग त्याच्यावर वैतागू नका, त्याला 'थँक्यू' म्हणा; कारण जाणून घ्या