Benefits Of Guava Leaves Mixed With Ginger : कामाचा ताण (Work Stress) आणि धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी बाजारातील औषधांवर अवलंबून न राहता, काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Remedies) आजमावणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आज आम्ही अशाच एका उपायाबाबत सांगणार आहोत. बाजारात मिळणारा पेरू आपण सगळे आवडीनं खातो. पेरूच्या फोडी करुन त्यावर मिठ, मसाला टाकला की, कामच झालं. एकदम भारी. पण अनेकांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पेरूसोबतच पेरूची पानंही आरोग्यदायी ठरतात. त्यातल्या त्यात इतर पदार्थांसोबत एकत्र करुन सेवन केल्यानं पेरूच्या (Guava Benefits) पानांचा फायदा अधिक होतो.
तुम्ही कधी पेरूची पानं आणि आलं एकत्र करून खाल्लंय का? नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पाहा. या दोन्ही पदार्थांचं मिश्रण आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतं. पेरूच्या पानांमध्ये पॉलिसेकेराइड, फायबर, व्हिटॅमिन सी, अँटी-हायपरग्लायसेमिक असे गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येतं आणि लठ्ठपणा वाढतो. जर आपण आल्याबद्दल बोललो, तर त्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. शिवाय, हे पोषक तत्वांचे भांडार आहे. एवढंच नाही तर पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी आढळतं, जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतं. जर तुम्ही पेरूच्या पानांचा अर्क आणि आलं यांचं नियमित सेवन केलं तर ते आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतं. जाणून घेऊयात, पेरूची पानं आणि आलं एकत्र खाण्याचे काय फायदे?
बद्धकोष्ठाची समस्या दूर करण्यासाठी
पेरूच्या पानांचा अर्क आणि आल्याचं सेवन केल्यानं बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. आतड्यात जमा झालेल मल मोकळं करून आतड्यांच्या हालचालींच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पेरूच्या पानांसोबत आल्याचं सेवन नक्की करा.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी
पेरूच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. तसेच, आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील भरपूर असतात. या दोन मिश्रणाच्या सेवनानं मधुमेहाची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकतं.
दातांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी
दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा रस आणि आल्याचा रस एकत्र करून कोमट पाण्यासोबत घ्या. याशिवाय हे मिश्रण काही काळ दातांवर लावू शकता. यामुळे वेदना कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी फादेशीर
शरीराचं वाढतं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पेरूची पानं आणि आलं यांचं मिश्रण खाणं, हा एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. यासाठी 1 कप पाण्यात पेरूची काही पानं उकळा आणि नंतर त्यात किसलेलं आलं घालून पाणी चांगलं उकळून घ्या. सकाळी या काढ्याचं सेवन केल्यानं तुमच्या शरीराचं वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं.
घसा खवखवणं
घसादुखीची समस्या कमी करण्यासाठी आलं आणि पेरूच्या पानांचा रस पिणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे घशातील सूज आणि दुखण्यापासून त्वरित आराम मिळू शकतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :