How to Stop Panic Attack : हल्ली ताण आणि टेंशनमुळे अनेकांना विविध आजार होतात. घरच्या किंवा आॅफिसच्या सततच्या ताणामुळे किंवा टेंशनमुळे स्वभाव चिडका बनतो. गेल्या काही वर्षांपासून अनेक वेगवेगळे आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच आता ‘पॅनिक अटॅक’चंही प्रमाण वाढत आहे. यामध्ये आपल्याला अचानकच खूप भीती वाटणे किंवा  सतत कसली ना कसली काळजी वाटू लागते. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, जास्त घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि नियंत्रणाबाहेर जाणे हा ‘पॅनिक अटॅक’असू शकतो. ‘पॅनिक अटॅक’ हा मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. काही लोकांना पॅनिक अटॅकमुळे श्वास घेता येत नाही आणि कधीकधी ही परिस्थिती घातक ठरू शकते. तर  मेंदूमध्ये असलेल्या सेरोटोनिन नावाच्या रसायनाच्या कमतरतेमुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते.


पॅनिक अटॅकपासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे (How To Protect Yourself From Panic Attacks)


- तुम्हाला जर सतत कोणत्या गोष्टीची भीती आणि तणाव जाणवत असेल आणि त्यातून बाहेर कसे यावे, हे लक्षात येत नसेल तर डॉक्टरांची मदत घेणे योग्य ठरू शकते. आजकाल मानसिक आरोग्याशी संबंधित प्रोग्रॅम घेतले जातात. त्यात वेळोवेळी सहभागी व्हा. 


- पॅनिक अटॅक येतो त्यावेळी तुम्हाला भिती वाटायला लागते. अशा परिस्थितीत दीर्घ श्वास घ्या. यासाठी गर्दीपासून दूर जा आणि मग दीर्घ श्वास तोपर्यंत घेत राहा जोपर्यंत तुम्हाला बरे वाटणार नाही. 


- जर तुम्ही अशा वातावरणात असाल जिथे तुमच्या आजूबाजूच्या काही गोष्टी तुमची भीती वाढवत असतील किंवा तुम्हाला चिंता वाटत असेल तर काही वेळ डोळे बंद करून बसा. असे केल्याने, तुम्हाला बरे वाटू शकते.


- जर सारखाच तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर ध्यान करणे तुमच्याकरता फायद्याचे ठरू शकते. हे तुमचे मन शांत करण्यास, तणावापासून आणि भीतीचा सामना  करण्यास मदत करते. 


-  पॅनिक अटॅकमधून बाहेर पडण्याकरता मसल्‍स रिलॅक्सेश टेकनिक फायद्याची ठरू शकते. असे केल्याने तुम्ही तणाव आणि चिंता या लक्षणांपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही तज्ञांच्या मदतीने ही टेकनिक शिकू शकता. 


- तुम्ही बाहेर फिरायला जाणे उत्तम ठरू शकते. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यावर जा. तसेच वीकेंडला लाँग ड्राईव्हवर जा.


 


इतर महत्वाची बातमी


Diet For Workplace : 'या' टिप्स तुम्हाला आॅफिसच्या वेळेत निरोगी आहार राखण्यास करतील मदत, जाणून घ्या