Kissing Health Benefits : चुंबन घेणे अर्थात किस (Kiss) करणे म्हणजे प्रेम (Love) व्यक्त करण्याची पद्धत मानली जाते. यामुळे दोन व्यक्तींमधील नातं अधिक मजबूत होते. पण किस करणे आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. किस करण्याने आनंद आणि प्रेम तर वाढतच पण तुम्हाला तणावमुक्त राहण्यासही मदत होते. किस करणे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यसाठी खूप लाभदायक आहे. किस करण्याचे फायदे जाणून घ्या.
Kiss Health Benefits : किस करण्याचे आहेत 'हे' भन्नाट फायदे
हॅप्पी हार्मोन्स तयार होतात
किस केल्याने मेंदूतून ऑक्सीटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन हे हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही राहता. किस केल्याने कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन शरीरातून बाहेर पडतो, त्यामुळे तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होते.
चिंता आणि तणाव कमी होतो
किस केल्याने कॉर्टिसोल हार्मोनची पातळी घटते. यामुळे तुमचा तणावही कमी होतो. यासोबत किस केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळते. तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते. ऑक्सिटोसिन हार्मोन कमी झाल्याने चिंता आणि तणाव कमी होतो, त्यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे की, किस केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 2014 च्या एका संशोधनात आढळून आले आहे की, ओठांवर किस करताना एकमेकांची लाळ मिसळली जाते. लाळेमध्ये कमी प्रमाणात काही जंतू असतात. हे तुमच्या शरीरात गेल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अँटीबॉडी तयार होण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रित होतो
एका संशोधनामध्ये समोर आलं आहे की, कि केल्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. किस केल्याने हृदयाचे ठोके वाढवून रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन कार्य सुरळीत होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे, रक्त प्रवाह वाढतो आणि रक्तदाब लगेच कमी होतो.
कॅलरीज बर्न होतात
किस केल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात. हे ऐकायला विचित्र वाटेल. पण हे खरं आहे. किस केल्याने सुमारे 2 ते 26 कॅलरीज कमी करता येतात. यासोबतच तुमचा ताणतणाव दूर होण्यास मदत होऊन तुम्ही आनंदी आणि उत्साही राहता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी, कुठे आणि का केलं, माहितीय? वाचा रंजक माहिती...