Jet Spray Harmful to Health: आताच्या आधुनिक सोयीसुविधांनी अद्ययावत असलेल्या टॉयलेट्समध्ये जेट स्प्रेचा वापर केला जातो. शौचाला गेल्यानंतर हाताचा स्पर्श न करता प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करता यावा, यासाठी जेट स्प्रेचा वापर केला जातो. पण सध्याच्या जगात सर्रास वापरला जाणारा जेट स्प्रे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतो. आता तुम्ही म्हणाल कसा? कारण जेट स्प्रेचा वापर तर सर्रास केला जातो आणि त्यात काही वावगं असं अनेकांना वाटत नाही. पण तुम्ही चुकताय, जेट स्प्रे (Jet Spray Harmful For Health) वापरणं तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे आरोग्यासाठी मोठा धोका उद्भवू शकतो. 


आपल्या प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूची त्वचा अत्यंत नाजूक असते. शौचाला जाऊन आल्यानंतर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी जेट स्प्रेचा वापर केला जातो. गुदभाग हा शरीराच्या इतर अवयावांपेक्षा तुलनेनं नाजूक असतो. ज्यावर मांसाचं किंवा हाडाचं आवरण नसतं. गुदभागाजवळ असणाऱ्या रक्तवाहिन्या आणि नसा हा त्वचेच्या अगदी जवळ असतात. अशा नाजूक भागावर जेट स्प्रेमधून येणाऱ्या थंड पाण्याच्या फवाऱ्याचा मारा होतो आणि यामुळे या भागाला इजा पोहोचण्याची भिती अधिक वाढते. 


विशेषतः हिवाळ्यात वातावरणात गारवा वाढतो. या गारव्यामुळे आणि वातावरणात वाढलेल्या कोरड्या हवेमुळे गुदभागाची त्वचा आणखी नाजूक होते. अशावेळी तुम्ही जर थंड पाण्याचा फवारा जेट स्प्रेमार्फत गुदभागावर मारला तर यामुळे त्या भागाला इजा होऊ शकते. 


जेट स्प्रे कोणासाठी घातक? 



  • ज्यांच्या सर्व अवयवांमध्ये उष्म रक्ताचा संचार जास्त असतो, त्यांना जेट स्प्रेच्या फवाऱ्यामुळे गुदभागातील रक्तवाहिन्यांना इजा होण्याची शक्यता अधिक असते. तसेच, जेट स्प्रेच्या फवाऱ्यामुळे या भागांत सूज येण्याचीही शक्यता अधिक असते. 

  • वात प्रकृतीच्या लोकांमध्ये थंडावा आणि कोरडेपणा यामुळे गुदभागात इजा होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तिथा आजारही होऊ शकतात.

  • एकंदरीत जेट स्प्रेमुळे होणारा त्रास आणि त्याच्या प्रेशरमुळे होणारं स्किन डॅमेज. जेट स्प्रेमुळे तिथली त्वचा ही लाल होते, तिथे खाज येते आणि जेट स्प्रेमुळे इरिटेशनही होतं, कधीकधी या भागात सूजही येऊ शकते.


जेय स्प्रे वापरावा की नाही? 


जेट स्प्रेमुळे होणारं नुकसान पाहता, आता तो वापरणं बंद करावं का? असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. पण नाही. जेट स्प्रे तुम्ही वापरा, पण तो योग्य पद्धतीनं वापरा. जेट स्प्रेच्या फवाऱ्यातील पाण्याचा वेग मर्यादित ठेवा. तसेच, जेट स्प्रेच्या वापरामुळे जर तुम्हाला स्किन डॅमेज होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Grapes Benefits For Health : आरोग्यदायी गुणधर्मांचा खजिना द्राक्षं; जास्त विचार करू नका बिनधास्त खा!