International Women’s Day: घरातील काम करण्यापासून नोकरी आणि करिअर घडवण्याचं काम महिला करतात, म्हणूनच त्यांना मल्टीटास्कर्क असं म्हटलं जातं. महिलांवर त्‍यांची मुले व कुटुंबाची काळजी घेण्‍याची जबाबदारी असते, तसेच त्‍या त्‍यांची वैयक्तिक व व्‍यावसायिक ध्‍येये साध्‍य करण्‍यामध्‍ये संतुलन देखील राखतात. या अशा व्‍यस्‍त जीवनशैलीमुळे अनेक महिलांचे त्‍यांच्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते. 


आंतरराष्‍ट्रीय महिला दिन जवळ आला असताना महिलांनी योग्‍य पोषणासह त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी का घेतली पाहिजे आणि सक्रिय जीवनशैली का राखली पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्‍यांना जीवनात पुढे जात राहण्‍यास मदत होईल, त्‍या दररोज जीवनाचा आनंद घेण्‍यास सक्षम होतील. अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन बिझनेस येथील मेडिकल अॅण्‍ड सायन्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख प्रत्‍येक महिलेच्‍या आहारामध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या सहा पौष्टिक घटकांबाबत सांगत आहेत, 


1. कॅल्शियम: कॅल्शियम जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हाडे मजबूत करण्यास मदत करते. शरीरात हाडे सतत रीमॉडेलिंग होत असतात हे अनेकांना माहीत नाही. या बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये हाडांमधून कॅल्शियमचे प्रमाण कमी होते, ज्‍याच्‍या जागी नवीन कॅल्शियमची भर होते. त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे. मसूर, बीन, सोयाबीन आणि फॅटी फिश यांसारख्या उत्पादनांसह संत्रा, पेरू आणि पपई यांसारख्या फळांमुळे शरीरात कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होते.


2. लोह: लोह हे एंजाइम आणि हिमोग्लोबिनसह अनेक प्रथिनांसाठी घटक म्हणून गरज असलेला आवश्यक सूक्ष्म पोषक घटक आहे. चयापचय प्रक्रियेसाठी संपूर्ण शरीरातील उतींमध्ये ऑक्सिजनच्या वहनासाठी हे महत्वाचे आहे. हे मानवी शरीरातील अनेक महत्त्वाच्‍या कार्यांसाठी देखील आवश्यक आहे जसे ऊर्जा चयापचय, मिक्‍स्‍ड-फंक्‍शन ऑक्सिडेस सिस्टम, न्यूरोडेव्हलपमेंट, संयोजी ऊतक संश्लेषण आणि संप्रेरक संश्लेषण. लोहाची कमतरता ही भारतीय महिलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य मिनरल कमतरता आहे. नट्स, सुकामेवा, शेंगा (मिश्रित सोयाबीन, भाजलेले बीन्‍स, मसूर, चणे), पालेभाज्या (पालक, ब्रोकोली), मासे, लाल मांस इ. हे लोहाचे चांगले स्रोत असू शकतात.


3. व्हिटॅमिन डी (जीवनसत्‍व ड): एक महत्त्वपूर्ण मिनरल असलेले व्हिटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फेटचे शोषण सुधारते, जे मजबूत, निरोगी हाडे राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्‍तीचे चांगले नियमन करण्यासाठी महत्वाचे आहे. बहुतेक लोक सामान्यतः सूर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डी मिळवतात, पण इतर स्त्रोतांमध्ये मशरूम, सोया दूध, अंडी, कोळंबी आणि फॅटी मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.


4. फायबर: रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी कमी करण्यासाठी विरघळणारे फायबर हा सर्वात प्रभावी पौष्टिक घटक आहे. पुरेसे पोषण मिळविण्यासाठी आहारामधून पुरेसे फायबर मिळणे महत्त्वाचे आहे, कारण ते पचन आणि शोषणास मदत करते. फायबरयुक्त पदार्थांमध्ये ओट ब्रान, बार्ली, नट, बिया, बीन्स, मसूर, मटार, फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो. तसेच, भरपूर पाणी पिल्याने तुम्हाला तुमच्या जेवणातील फायबरचा पुरेपूर वापर करण्यास मदत होते.


5. व्हिटॅमिन बी 12: व्हिटॅमिन बी 12 लाल रक्त पेशी, मज्जासंस्था आणि मेंदूचे कार्य व विकास करण्यास मदत करते. थकवा व अशक्तपणा व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात आणि तुमचे वय वाढत जाईल तसतसे शरीर बी 12 वापरण्याची शक्यता कमी होऊ शकते. आजाराला प्रतिबंध करणारे धोरण आखण्‍यासाठी रक्ताचे नमूने तपासले पाहिजेत. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारखे पदार्थ मुख्य व्हिटॅमिन बी 12 देऊ शकतात.


6. प्रथिने: नायट्रोजनचे योग्‍य संतुलन राखण्यासाठी माफक प्रमाणात उच्च प्रथिने मिळणे आवश्यक आहे. कमी ऊर्जेचे सेवन, बिघडलेले इन्सुलिन कार्य आणि प्रथिने संश्लेषणातील घट या सर्व गोष्टी वृद्धत्व काळात घडतात, याबाबत काळजी घेणे देखील आवश्यक आहे. प्रथिन-संपन्‍न आहार संतुलित आहार असतो, ज्यामुळे ऊर्जा आणि शक्ती वाढते. अंडी, मांस, मासे, कडधान्ये आणि शेंगा यांसारखे पदार्थ शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिने पुरवतात.