Herbal Extract For Health : कोरोनापासून (Corona) आपला बचाव करण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. तज्ज्ञ सुरुवातीपासूनच सांगत आहेत की, ज्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत असेल त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होईल. रोगप्रतिकारकशक्ती अर्थात इम्युनिटी मजबूत असणाऱ्या लोकांना कोरोना झाला, तरी परिस्थिती फारशी गंभीर नसते. कोरोनापासून बरे झाल्यावरही अशा लोकांचे शरीर लवकर बरे होते. जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर तुम्ही औषधांव्यतिरिक्त काही औषधी वनस्पती देखील वापरू शकता. अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्या तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि शरीर बळकट करण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 हर्बल अर्कांबद्दल सांगणार आहोत, जे कोरोनामध्ये तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतील... 


तुळस (Basil) : तुळस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. तुळशीची पाने आणि बियांचा आयुर्वेद आणि घरगुती उपचारांमध्ये वापर केला जातो. तुळस अनेक आजार बरे करण्यात फायदेशीर ठरते. तुळशीचा वापर सर्दी-खोकल्यापासून आराम आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. तुळशीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो.


शेवगा (Moringa) : शेवग्याला सुपरफूड देखील म्हटले जाते. शेवगा हे आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. शेवगा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. ही वनस्पती  व्हिटॅमिन सी, ए आणि कॅल्शियमने समृद्ध आहे. याच्या सेवनामुळे अॅनिमियाच्या समस्येवर मात करून, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही याचा वापर केला जातो.


शतावरी (Ginseng) : शतावरी ही एक अशी वनस्पती आहे, ज्याच्या मुळांचा आयुर्वेद, होमिओपॅथिक आणि चायनीज औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शतावरी अर्थात जिनसेंगयुक्त चहा प्यायल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पचन सुधारण्यापासून ते झोपेचे विकार दूर करण्यापर्यंत अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी शतावरीचा वापर केला जातो. शतावरी वजन कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते.


कोरफड (Aloevera) : कोरफडीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळते. कोरफडीमुळे केस आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते. केस गळणे, कोरडेपणा आणि त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन बी12 आणि फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि जळजळ होण्याची समस्या कमी होते. कोरफडीचा रस प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात.


अश्वगंधा (Ashwagandha) : आयुर्वेदिक औषधात अश्वगंधा अनेक प्रकारच्या औषधांमध्ये वापरली जाते. अश्वगंधामध्ये तणावविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तणाव, चिंता यांसारख्या मानसिक समस्या दूर होतात. याशिवाय अश्वगंधामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि झोपेच्या समस्याही दूर होतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha