Thyroid Disease :  थायरॉईडच्या आजारानं जगभरात अनेकजण त्रस्त आहेत. भारतात देखील कोट्यवधी लोक थायरॉईडग्रस्त आहेत. म्हणजेच भारतात 10 पैकी एक व्यक्ती थायरॉईड पीडित आहे. यात महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण सर्वाधिक  पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉईड होण्याची शक्यता 80% पेक्षा जास्त असते. याचं कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल बदल. महिलांमध्ये आयोडिनची कमतरता असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त असतं.


तज्ञांच्या माहितीनुसार, "शरीरातील पचनक्रिया समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम थायरॉईड ग्रंथी करते. यामधून स्रवणारं हार्मोन शरीराचं तापमान समतोल राखण्याचं, मेंदू तंदुरुस्त ठेवण्याचं, हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्याचं कार्य करतं.   


थॉयरायडचे दोन प्रकार 
थायरॉईड होणं म्हणजे नेमकं काय? तर थायरॉईड ग्रंथीने तिच्या कार्यापेक्षा जास्त काम केल्यास हायपरथायरॉईड होतो. तर ह्या ग्रंथीने तिच्या कार्यापेक्षा कमी केल्यास हायपोथायरॉईड होतो. लोकांमध्ये हायपोथायरॉईडचं प्रमाण जास्त असतं, जे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाविकारला कारणीभूत ठरु शकतं. 


थायरॉईड झाल्याचं कसं समजतं? 


थायरॉईड झाल्याचं लवकर समजल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. औषधं किंवा लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास यावर नियंत्रण मिळवता येतं. याची लक्षणं फारच छोटी असतात आणि ती समजण्यास कठीण असतात. त्यामुळे थायरॉईड झालाय की नाही हे तपासण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे रक्त तपासणी. रक्ताद्वारे टीएचएच लेव्हलची तपासणी करता येते.  डायबेटिजचे रुग्ण, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणारे लोक, अनुवांशिकता, हार्मोन्समध्ये बदल, गरोदरपणा किंवा मेनोपॉज, वाढतं वय असलेल्या व्यक्तींमध्ये  थायरॉईडचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे मेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या जवळ असलेल्या महिलांनी थायरॉईडची तपासणी करणं गरजेचं आहे.  


हायपोथायरॉईडची लक्षणं
अशक्तपणा आणि थकवा
वजन वाढणं
थंडी सहन न होणं
शुष्क आणि मऊ केस
विस्मरणाचा त्रास
चीडचीड आणि टेंशन
जास्त कोलेस्ट्रॉल
हृदयाचे ठोके कमी पडणं
बद्धकोष्ठ


हायपरथायरॉईडची लक्षणं
वजन कमी होणं
उकाडा सहन न होणं
पोट बिघडणं
कंप सुटणं
घाबरणं आणि चीडचीड होणं
थायरॉईड ग्रंथी वाढणं
झोप न येणं
थकवा


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या 


Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स


Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स


Covid-19 : मास्कच्या वापरात निष्काळजीपणा करताय? तर मग सावधान! जाणून घ्या मास्क वापरण्याचा योग्य मार्ग