Life expectancy: कोरोना महामारीमुळे (Covid-19 Pandemic) लोकांचे जीवनमान घटले आहे. होय, हा धक्कादायक खुलासा IIPS च्या संशोधनातून समोर आला आहे. अनेक स्तरांवरून जनजीवन विस्कळीत झाल्याचे अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचे सरासरी आयुर्मान (Life expectancy) दोन वर्षांनी कमी झाले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS), मुंबईच्या शास्त्रज्ञांच्या सांख्यिकीय विश्लेषणामध्ये हे उघड झाले आहे.
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनात घट
या अहवालानुसार, साथीच्या आजारामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये जन्माच्या वेळी आयुर्मानात घट नोंदवण्यात आली आहे. हा अहवाल नुकताच 'बीएमसी पब्लिक हेल्थ' जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. आयआयपीएसचे प्राध्यापक सूर्यकांत यादव यांनी हा अहवाल तयार केला आहे.
जाणून घ्या आता अंदाजे किती आयुष्य
रिपोर्टनुसार "2019 मध्ये आयुर्मान पुरुषांसाठी 69.5 वर्षे आणि स्त्रियांसाठी 72 वर्षे होते, जे 2020 मध्ये अनुक्रमे 67.5 वर्षे आणि 69.8 वर्षांवर आले आहे." जर जन्मावेळी मृत्यूची प्रवृत्ती भविष्यात स्थिर राहिल्यास नवजात शिशु जिवंत राहण्याची शक्यता असलेल्या सरासरी वर्षांच्या आधारावर जन्माच्या आयुर्मानाची गणना केली जाते.
39-69 वर्षे वयोगटातील लोकांचा अधिक मृत्यू
प्रोफेसर यादव यांच्या अभ्यासात 'जीवनातील असमानता' देखील पाहयला मिळाली. यात कोविड-19 मुळे सर्वाधिक मृत्यू 39-69 वयोगटातील असल्याचे आढळून आले आहेत. यादव म्हणाले, "सामान्य वर्षांपेक्षा 2020 मध्ये 35-79 वयोगटातील कोविड-19 मुळे जास्त मृत्यू झाले आहेत आणि हा गट आयुर्मान कमी होण्यास अधिक जबाबदार आहे."
देशातील कोरोना मृतांची संख्या चिंताजनक
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.
संचालक काय म्हणाले?
आयआयपीएसचे संचालक डॉ.के.एस. जेम्स म्हणाले, “प्रत्येक वेळी जेव्हा आपण साथीच्या आजाराने ग्रस्त असतो, तेव्हा जन्माच्या वेळी आयुर्मान कमी होते. उदाहरणार्थ, एचआयव्ही-एड्स महामारीनंतर आफ्रिकन देशांमध्ये आयुर्मान कमी झाले. जेव्हा ते नियंत्रणात येते, आयुर्मान सुधारते.