How Will You Change Your Kids Junk Food Habits : अनियमित आहार (Irregular Diet), व्यायामापासून (Exercise) राखलेलं अंतर आमि धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) अशा काही चुकीच्या सवयींमुळे आपण स्वतःहून आपलं शरीर आजारांच्या ताब्यात नेवून देतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर होतो. एखाद्या प्रौढ व्यक्ती किंवा लहान मूल (Kids) जास्त जंक फूड (Junk Food) खात असेल तर ते आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक ठरतं. जंक फूडची (Fast Food) सवय आपलं आयुष्य कमी करते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून जंक फूडचं अतिसेवन शरीरासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुलांना हेल्दी फूड खाण्याची सवय लावणं कधीही फायदेशीर ठरतं. पण शेवटी मुलं ती मुलंच, ती ऐकतील तर शपथ्थ. 


जंक फूड आणि त्याचं आकर्षण मुलांमध्ये काही केल्या कमी होत नाही. जंक फूडची सवय आणि त्याचं आकर्षण यापासून मुलांना लांब ठेवायचं असेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा 5 टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मुलांना जंक फूडपासून दूर घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. संशोधनानुसार, जी मुलं जास्त जंक फूड खातात, त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तसेच, जंक फूडच्या अतिसेवनानं किडनीवरही परिणाम होतो आणि किडनीच्या आरोग्यावर परिणामही होतो. 


मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदला


मुलांच्या आहारात अचानक बदल करणं थोडं कठीण असतं. अशा परिस्थितीत मुलांना हळूहळू सकस अन्न खाण्याची सवय लावायला हवी. जेणेकरुन योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळतील. एखादा पौष्टीक पदार्थ तुम्ही मॉर्डन टच देऊन तयार करू शकता. त्यामुळे मुलंही ते खाताना कानकूस करणार नाहीत. 


मुलांच्या आवडीचं हेल्दी फूड 


जर तुमचं मूल भाज्या किंवा हेल्दी फूड खाणं टाळत असेल, तर याच भाज्यांना मॉर्डन टच द्या आणि मुलांना खायला द्या. त्यांना न आवडणाऱ्या भाज्यांसोबत टोमॅटो सॉस किंवा साखर घालून दही द्या. भाज्या साध्या पद्धतीनं न बनवता थोड्या वेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवा. 


मुलांची समजूत घाला 


मुलांच्या आहारात बदल करण्यापूर्वी आधी त्यांचा मूड समजून घ्या. जर त्यांची समजूत घालणं शक्य असेल, तर त्यांना प्रेमानं समजवा. त्यांना हिरव्या भाज्यांचं महत्त्व समजावून सांगा. 


डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करा


मुलांच्या आहारात जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश करा. यामुळे अक्सट्रा कॅलरीपासून मुलं दूर राहतील. तसेच, प्रोटीनमुळे मुलांचं पोट बराचवेळ भरलेलं राहील आणि त्यांना जंक फूड खाण्याची इच्छाच होणार नाही. दूध, अंडी, मासे, चिकन आणि धान्य यांचा आहारात समावेश करा. 


 खाण्याची वेळ निश्चित करा 


मुलांच्या जेवणाची वेळ निश्चित करा. आठवड्याभराचा मेन्यू ठरवा. त्यामुळे मुलांना दररोज वेगवेगळे पदार्थ खाऊ घालता येतील आणि मुलंही आवडीनं खातील त्यांना खाण्याचा कंटाळा येणार नाही. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Alcohol Blackout: अल्कोहोल ब्लॅकआउट म्हणजे काय? बहुतेकदा दारू प्यायल्यानंतर दिसतात 'ही' लक्षणं!