Cinnamon Health Benefits : हिवाळ्यात अनेक आजर डोकं वर काढतात. अशावेळी बॅक्टेरियल इंफेक्शनचा (Bacterial Infection) धोका वाढतो. शिवाय सर्दी (Cold), कफ (Cough) यासारखे आजारही बळावतात. या आजारांवर तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेली दालचिनी अतिशय गुणकारी आहे. दालचिनीचं सेवन केल्याने तुम्हाला सर्दी, पडसे आणि कफ यापासून आराम मिळू शकतो. या समस्येपासून सुटका हवी असल्यास दालचिनीचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
दालचिनी मसाल्याचा पदार्थ आहे. हा पदार्थ प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतो. दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. मसालेयुक्त पदार्थांमध्ये सर्वाधिक अँटीऑक्सिडेंट लवंगमध्ये असतात. त्यानंतर दालचिनीमध्येही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. आयुर्वेद, होमियोपॅथी आणि एलोपॅथीमध्ये लवंग आणि दालचिनीमधील औषधी गुणांचं महत्त्व सांगितलं जातं.
दालचिनी हे झाडाच्या सालीपासून तयार करतात. मसाल्यातील तमालपत्र तुम्हाला माहित असेल. या तमालपत्राच्या झाडाच्या सालीला सुकवल्यावर त्यालाच दालचिनी असं म्हणतात. ही झाडं उंच असतात. या झाडाच्या सालीचा उपयोग दालचिनी म्हणून केला जातो. या झाडाची पानं सुकवून त्याचा वापर तमालपत्र म्हणून केला जातो. दालचिनी हा गरम पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार, दालचिनी फार उपयुक्त आहे. दालचिनी वात आणि कफ दोष दूर करण्यात फायदेशीर आहे. मात्र, याच्या अधिक सेवनाने पित्ताची समस्या उद्धवू शकते. त्यामुळे याचं सेवन योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे.
दालचिनीचे फायदे
दालचिनी वात आणि कफ नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजेच या दोन्ही दोषांमुळे होणारे आजार दालचिनीच्या सेवनाने आटोक्यात ठेवता येतात.
या आजारांवर दालचिनी गुणकारी
- पचनाची समस्या
- कोलेस्टेरॉल
- रक्तदाबाची समस्या
- मधुमेह
- मासिक पाळीच्या समस्या
- मानसिक आरोग्याच्या समस्या
- कफ
- थंड
- ताप
- व्हायरल इंफेक्शन
- फंगल इंफेक्शन
दालचिनीचे सेवन किती करावे?
दालचिनी हा अतिशय गरम मसाला आहे. याचे जास्त सेवन केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ, त्वचेवर खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून, दररोज मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
एक व्यक्ती एका दिवसात दालचिनीचा एक इंच मोठा तुकडा खाऊ शकतो. तुम्ही दालचिनी पावडर वापरत असाल तर दिवसभर सामान्य आकाराच्या चमचे वापरा. पण वरपर्यंत चमचा भरू नका.
दालचिनी कशी वापरावी?
- तुम्ही दालचिनीचा वापर जेवणामध्ये करू शकता.
- तुम्ही दालचिनीचा चहा किंवा काढा बनवून पिऊ शकता.
- दुधासोबत दालचिनी पावडरचं सेवन करु शकता.
- दालचिनीचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि चॉकलेटप्रमाणे चघळा.
खोकला किंवा कफ असल्यास 'हा' उपाय करा
थंडीच्या मोसमात घसा खवखवणे, कफ, सर्दी किंवा तापाची समस्या उद्भवते. थंड वाऱ्यांमुळे शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशावेळी तुम्ही दालचिनीची वापरू शकता. यासाठी तुम्ही एक चतुर्थांश चमचा (1/4) दालचिनी पावडर एक चमचा मधात मिसळा. हे मिश्रण बोटाच्या साहाय्याने हळूहळू चाटून खा. सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. तुम्हाला लवकरच याचा फायदा जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या