How To Take Care Of Nails: सौंदर्याची (Beauty Tips) व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. अनेकजण बाह्य सौंदर्यावर भर देतात. आपला चेहरा, केसांची काळजी घेतली जाते. पण सौंदर्यात भर घालण्यासाठी केस आणि त्वचेसोबतच आपली नखंही (Nails) तितकीच महत्त्वाची असतात. नखांचं आरोग्य (Healthy Nails) राखण्यासाठी बाजारातील उत्पादनांसोबतच इतर उपयाही केले जातात. हल्ली तर बाजारात फक्त नखांचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक सलॉन सुरू करण्यात आले आहेत.  


अनेकदा आपण नखांचं सौंदर्य वाढवण्यासाठी नेलपेन्ट लावतो, पण आपण त्यांची काळजी घेणं मात्र विसरून जातो. परंतु नखांची योग्य ती काळजी घेतली नाही, तर नखं तुटतात किंवा पिवळी पडतात. त्यामुळे नखांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. 


नखांची काळजी कशी घ्याल? (How To Take Care Of Nails?)




स्क्रबिंग करा 


नखांचं सौंदर्य टिकवण्यासाठी मेनिक्योर अत्यंत फायदेशीर ठरतं. मेनिक्योर करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊ शकता, त्यासोबतच तुम्ही घरच्या घरीही मेनिक्योर करू शकता. मेनिक्योर करण्यासाठी स्क्रब घेऊन त्यानं हातांवर व्यवस्थित स्क्रबिंग करा. जोपर्यंत हातांवर पूर्णपणे डेड सेल्स आणि घाण स्वच्छ होत नाही, तोपर्यंत व्यवस्थित स्क्रब करा. त्यानंतर फायलरच्या मदतीनं नख फाईल करून घ्या. नखांच्या आजूबाजूची त्वचा क्यूटिकल क्लिपर्सचा वापर करून काढा.


स्क्रब करण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या स्क्रबचा वापर करू शकता. किंवा तुम्ही घरच्या घरीही स्क्रब तयार करू शकता. साखर, लिंबू, थोडीशी कॉफी पावडर आणि मध हे सर्व पदार्थ एकत्र करून तुम्ही स्क्रब तयार करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात. तसेच, त्वचा उजळण्यास मदत होते. 




नेलपेन्ट लावा 


नखांना परफेक्ट शेपमध्ये फाईल करण्यासाठी बेस कोट कलर्सची नेलपेंट लावा. बेसची फक्त एकच लेयर लावा. जर तुम्हाला नेलपेंट व्यवस्थित लावणं शक्य होत नसेल तर आजूबाजूच्या स्किनवर पेट्रोलियम जेली लावा. त्यामुळे नेलपॉलिश नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लागणार नाही. 




फिनिशिंग टच 


नेलपेंट नखांच्या खालील भागांवर लावू नका. फिनिशिंग टच देण्यासाठी नखांवर ट्रान्सपरन्ट नेलपेंट लावा. यामुळे मेनिक्योर बराच काळ टिकण्यासाठी मदत होईल आणि नखांवर ग्लो येईल. 


एक्सपर्ट सल्ला 


कडक उन्हामुळेही नखं पिवळी पडतात. यापासून वाचण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करू शकता. नेलपेंट लावण्यासाठी बेसकोट अप्लाय करा. यामुळे नखांचा उन्हापासून बचाव होतो आणि ती पिवळी पडत नाही. साबणाच्या पावडरचा वापर केल्यानंतर नखांवर मसाज क्रिम दररोज अप्लाय करा. क्रिम लावल्यानंतर कापसानं हळूहळू पुसून टाका. रात्री झोपण्यापूर्वी चांगल्या तेलानं हातांना मसाज करा.




घरगुती उपायांचा वापर करा 


नखं चमकदार बनवण्यासाठी एक टिस्पून जेलेटिन गरम पाण्यामध्ये टाका. पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये सिट्रिक ज्यूस टाका. या मिश्रणाने नखं स्वच्छ करा. 


पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि 15 मिनिटांपर्यंत त्यामध्ये हात बुडवून ठेवा. त्यानंतर कापसाच्या मदतीनं पुसून टाका. नखांना पिवळं होण्यापासून वाचवण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा आणि 10 मिनिटांपर्यंत आपले हात त्यामध्ये बुडवून ठेवा. त्यामुळे पिवळेपणा दूर होईल. 


नखांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स 



  • नेलपेंट लावत असाल तर तिचा जास्त वापर कमी करा. त्यामध्ये असलेले केमिकल्स नखं पिवळी पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

  • आहारामध्ये प्रोटीनयुक्त डाएटचा समावएश करा. कारण नखं प्रोटीन्सपासून तयार झालेली असतात. 

  • नखं खाण्याची सवय असेल तर असं करणं लगेच थांबवा. 

  • जर तुमच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा निघत असले, तर त्यावर क्युटिकल ऑईल किंवा क्रिम लावा. 

  • हेल्दी नखं आणि त्यांचा ड्रायनेस कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाच्या तेलाने मसाज करा.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Diet For Glowing Skin : चिरतरुण दिसायचंय, मग 'या' फळांचा डाएटमध्ये समावेश करा, फक्त आठवडाभरातच फरक दिसेल!