DIY Tips For Sore Throat : सध्या बरेचजण घसा खवखवण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याचं कारण हळूहळू वातावरणात थंडीचं प्रमाण वाढू लागलं आहे. गुलाबी थंडीचा पहिला परिणाम शिंका येण्याच्या रूपात दिसून येतो. त्यासोबतच नाकातून थोडेसे पाणी येणे आणि नंतर घसा खवखवणे किंवा थोडा खोकला येण्याची समस्या अनेकांना जाणवते. 


बदलत्या ऋतूत होणाऱ्या या समस्यांकडे सामान्य लक्षण म्हणून दुर्लक्ष करू नका. त्यापेक्षा त्यांना वाढण्यापासून कसे रोखता येईल हा विचार करा. कारण घसा खवखवणे आणि हलकीशी शिंक येणे हे सर्दी आणि कफचे कारण बनू शकते, ज्यामुळे तापाची समस्या उद्भवते. असं असलं तरी या बदललेल्या ऋतूत व्हायरल फिव्हर खूप पसरत आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.


घसा खवखवल्यास काय करावे?


जर तुमचा घसा खवखवत असेल तर काही घरगुती उपायांनी तुम्ही स्वतःला हंगामी समस्यांपासून वाचवू शकता.


मिठाच्या पाण्याने गुळण्या करा :


तुम्ही एक ग्लास पाणी गरम करा आणि त्यात अर्धा चमचा मीठ घाला. आता या पाण्याने गुळण्या करा. हे दिवसाच्या सुरुवातीला सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी करा. यामुळे घसा स्वच्छ राहील आणि या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. कारण हे पाणी घसा खवखवणारे बॅक्टेरिया मारून टाकते.


आल्याचा काळा चहा :


सकाळी गुळण्या केल्यानंतर तुम्ही काळ्या चहाचे सेवन करू शकता. हा चहा तयार करण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करा. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवणार नाही.


मधाचे सेवन करा : 


न्याहारी आणि अन्न खाल्ल्यानंतर घशाला त्वरित आराम मिळण्यासाठी एक चमचा मध घेऊन ते चाटावे. मध अँटी-बॅक्टेरियल प्रभावाने समृद्ध आहे. त्यामुळे घशाच्या समस्येत त्वरित आराम मिळतो. काही लोक गरम पाण्यात मध मिसळून प्यायचा सल्ला देतात, पण असे करू नका. गरम पाण्यात मध वापरू नये. कोमट पाण्यात तुम्ही मध वापरू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Seasonal Vegetable : बीपी आणि हृदयरोगावर फायदेशीर आहे 'सिंगाडा'; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे