नवी दिल्ली : कोरोना संसर्गावर विकसित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी जगभरातील नागरीकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. मात्र, आजा बाजारात बनावट कोरोना लस (Fake Corona vaccine) आढळल्याने सरकारसाठी चिंतेचा विषय झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थआ (WHO) ने कोविड -19 लसींच्या बनावट आवृत्तीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे, यामुळे लसीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.


अलीकडेच डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्यांना दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत एस्ट्राझेनेका/ऑक्सफोर्डच्या कोविशील्ड लसीच्या डुप्लिकेट व्हर्जन आढळल्या आहेत.


परिणामी, केंद्र सरकारने राज्य सरकारला बाजारात उपलब्ध बनावट कोविड लस ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.


Corona Vaccine : 'बायोलॉजिकल ई'च्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीसाठी DCGI ची मंजुरी


सध्या भारतीय बाजारात कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी तीन लस उपलब्ध आहेत. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड, भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि रशियन लस स्पुटनिक व्ही.


कोविशिल्डची लस कशी ओळखाल?



  • कुपीच्या बाटलीवर खालील तपशील असावेत

  • एसआयआय (SII) उत्पादन लेबल

  • ट्रेडमार्क असलेले ब्रँड नेम (Covishield) तिथे असावे

  • जेनेरिक नावाचा फॉन्ट अन-बोल्ड असेल

  • Recombinant समान फॉन्टमध्ये सामान्य नावाच्या खाली नमूद केले जाईल.

  • CGS विक्रीसाठी नाही

  • लेबलच्या चिकट बाजूला SII लोगो असेल.

  • लेबल कलर शेड गडद हिरवा आहे आणि अॅल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील गडद हिरवा आहे.


कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं : डॉ. अँथनी फाऊची


कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं आहे, असं मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य (White House) आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची (Dr. Anthony Fauchi) यांनी व्यक्त केलं आहे. दोन डोस घेतल्यानंतरही काही महिन्यानंतर लसीची कार्यक्षमता लसीचा प्रभाव कमी होऊन कोविड संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, तिसरा 'बुस्टर' (Booster Dose) डोस घेतला तर कोविड संसर्गाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, अशी आकडेवारीच त्यांनी सादर केली. इस्रायलमध्ये तिसरा डोस दिल्यानंतर कशा पद्धतीने संरक्षण मिळतं याचे दाखलेही त्यांनी दिले. त्यामुळे कोविड लसीचे दोन नव्हे तर तीन डोस घेणं हे नित्याचंच होईल कारण तशीच गरज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.