What are Vata, Pitta, Cough Dosha : सध्या अनेक जण आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करून आजारापासून सुटका मिळवतात. आयुर्वेदिक पद्धतीमध्ये तुम्ही वात-पित्त आणि कफ हे तीन शब्द नक्कीच ऐकले असतील. बहुतेकांना या शब्दांचा अर्थ आणि आयुर्वेदात याचं महत्त्व आणि त्याचा शरीरावर होणारा प्रभाव याबद्द्ल माहिती नसते. कोरोनाच्या काळानंतर लोकांचा आयुर्वेदाकडे कल खूप वाढला आहे आणि आता लोकांना पुन्हा नैसर्गिक आणि हर्बल पद्धतीने त्यांच्या आजारांवर उपचार करायचे आहेत.


आयुर्वेद ही पूर्णपणे नैसर्गिक चिकित्सा पद्धती आहे, ज्यामध्ये औषधी वनस्पतींच्या मदतीने उपचारांना प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदामध्ये आरोग्य वात, पित्त आणि कफ यावर आधारित असल्याचं मानलं जातं. या तिघांचे संतुलन हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. यापैकी एकातही बिघाड झाली तर आपलं आरोग्य बिघडतं. वात, पित्त आणि कफ यां तिघांना आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे तीन दोष म्हटलं जातं.


वात, पित्त आणि कफ यांच्या संतुलनात बिघाड कसा होतो?


या तीन दोषांमधील असंतुलन नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशा दोन कारणांमुळे होते. यातील नैसर्गिक असंतुलन म्हणजे ऋतू आणि वयाच्या बदलामुळे होणारे आजार. अनैसर्गिक म्हणजे चुकीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा कोणत्याही संसर्गजन्य रोगामुळे होणारे आजार.


कफचा त्रास बालपणात जास्त होतो. त्याशिवाय हिवाळ्यामध्येही याची समस्या जाणवते. पित्ताचे प्रमाण उन्हाळ्यात आणि तरुणपणात वाढते. तर वातदोष शरद ऋतूत आणि वृद्धापकाळात वाढतो. पण हे नैसर्गिक बदल आहेत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत.


वात वाढल्यावर काय होते?



  • शरीरात वात म्हणजेच हवा वाढली की अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात.

  • तणाव

  • चुकीची जीवनशैली

  • पुरेशी झोप न मिळणे

  • हवा वाढवणाऱ्या अन्नाचं जास्त सेवन


वात वाढल्यावर काय होते?



  • शरीरात हवेचं प्रमाण वाढलं की अधिक वात तयार होतो.

  • पोट फुगणे 

  • अंग दुखी

  • अस्वस्थ वाटणे

  • निद्रानाश

  • शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा


पित्त दोष असंतुलित झाल्याची लक्षणे


शरीराचे तापमान राखण्यासाठी आणि भूक नियंत्रित करण्यासाठी पित्त जबाबदार असतं. शरीरातील पित्त असंतुलित झाल्यास पचनाच्या समस्या सुरू होतात. याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे जास्त मसालेदार आणि तळलेले अन्नपदार्थ खाणे किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे. जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.


पित्त असंतुलित झाल्यास काय परिणाम होतो?



  • खूप राग येणे

  • मुरुमांची समस्या

  • त्वचेवर पुरळ उठणे

  • शरीरावर सूज येणे

  • गरमी होणे

  • छातीत जळजळ

  • आंबट ढेकर येणे

  • मळमळ

  • लहान वयात केस पांढरे होणे


कफ वाढल्यावर काय होते?



  • वारंवार खोकल्याचा त्रास

  • नैराश्याची वाढते

  • त्वचेला खाज येणे

  • सांधे दुखी

  • छातीत गच्च वाटणे

  • डोकेदुखी 

  • चेहऱ्यावर सूज एकत्र येणे. वगैरे


कफची समस्या का वाढते?



  • जास्त झोपणे

  • दिवसा उशिरापर्यंत झोपणे

  • जास्त खाणे

  • व्यायाम न करणे

  • अधिक गोड अन्न खाणे

  • तळलेल्या पदार्थांचे अधिक सेवन