HMPV Outbreak: मागील काही वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत कठीण होती. कारण साधारण 2020 सालापासून कोरोना महामारीने अवघ्या जगभरात उच्छाद मांडला होता. कोरोनामुळे विविध देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या प्रभावातून आजही लोक सावरू शकलेले नाहीत की, आता चीनमध्ये आणखी एक विषाणूने उच्छाद मांडली आहे, ज्याचा धोका संपूर्ण जगासाठी निर्माण झाला आहे. या विषाणूचे नाव ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे, ज्यामुळे चीनमध्ये या आजाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हा विषाणू भारतासाठी किती धोकादायक आहे आणि भारतात त्याचा प्रसार होऊ नये यासाठी काय केले जाऊ शकते. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वक्तव्य आले आहे. HMPV विषाणू भारतासाठी किती धोकादायक आहे? या विषाणूचा भारतावर परिणाम होऊ शकतो की नाही? याबाबत देशाचे आरोग्य मंत्रालय आणि इतर आरोग्य तज्ज्ञ त्यांचे मत देत आहेत. 


कोरोनामुळे जगभरात हाहाकार


2020 मध्ये चीनमधून उद्भवलेल्या कोविड-19 (कोरोना व्हायरस) या विषाणूने भारतासह संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. कोरोना महामारीच्या फैलावामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि जगाला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लोकांनी त्यांच्या घरात राहून अनेक महिने काढले होते. एकीकडे साथीच्या रोगाने लोकांचा जीव घेतला, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांचे व्यवसाय, रोजगार ठप्प झाला. निराश होऊन अनेक लोकांनी आत्महत्याही केल्या होत्या.


भारतासाठी चिंता वाढली?


चीनमध्ये पसरलेल्या HMPV विषाणूबद्दल बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, देशात व्हायरल इन्फेक्शन आणि श्वसन रोगांच्या संख्येत म्हणावी तितकी मोठी वाढ झालेली नाही. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र म्हणतात की, त्यांची टीम देशभरातील इन्फ्लूएंझा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. जागतिक स्तरावर या आजारांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी देखील संपर्क साधला जात आहे.


सावधगिरी बाळगण्याचे आवाहन


आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल यांनीही एक निवेदन दिले की चीनमध्ये आढळलेला विषाणू हा श्वसनाच्या विषाणूसारखा आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे वृद्ध आणि अगदी लहान मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यांनी लोकांना श्वासोच्छवासाच्या आजारांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आणि सांगितले की त्यांनी भारतातील श्वसन रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. डिसेंबर 2024 साठी या आकडेवारीत कोणतीही वाढ झालेली नाही. देशातील कोणत्याही संस्थेकडून मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली नाहीत.


2001 मध्ये नेदरलँडमध्ये हा विषाणू पसरला


DGHS ने डॉ. अतुल गोयल यांना सांगितले की भारतीयांनी संसर्ग टाळण्यासाठी नेहमीची खबरदारी घ्यावी. जर एखाद्याला सर्दी-खोकला असेल तर त्याच्या संपर्कात येणे टाळावे. सर्दी आणि तापासाठी लागणारी नेहमीची औषधे घ्या. सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही. हिवाळ्यात श्वसन व्हायरसच्या संसर्गाची शक्यता जास्त असते. चीनमध्ये पसरलेला विषाणू नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये पहिल्यांदा पसरला होता. या विषाणूमुळे सामान्यतः सर्दीसारखी लक्षणे उद्भवतात.


आरोग्य तज्ज्ञ सांगतात..


यामुळे अनेकदा न्यूमोनिया, दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होतो. यूएस मधील क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, संशोधकांचा अंदाज आहे की 10% ते 12% मुलांमध्ये श्वसनाचे आजार HMPV मुळे होतात. 5% ते 16% मुलांमध्ये निमोनियासारखी लक्षणे दिसून येतात. डॉ. डांग्स लॅबचे सीईओ डॉ अर्जुन डांग सांगतात की, हा विषाणू नवीन नाही आणि आमच्या प्रयोगशाळांमध्ये त्याची नियमित चाचणी केली जात आहे. काळजी करण्याची गरज नाही, कारण आतापर्यंत काहीही असामान्य आढळले नाही.


हेही वाचा>>>


HMPV: कोविड-19 नंतर पुन्हा एक मोठे आव्हान? कोरोनानंतर चीनमध्ये 'या' विषाणूचा प्रादुर्भाव, 14 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं संकटात? जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )