मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेक वेळा आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अलिकडच्या काळात ह्रदयरोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ह्रदयाचं आरोग्य (Heart Health) उत्तम राखण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्रदयाचं उत्तम आरोग्यासाठी प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक आहार घेण्याची आवश्यकता असते. या पोषकतत्वांचा आहारात समावेश केल्याने ह्रदय स्वास्थ चांगलं राखलं जाईल. आहारात डाळींचा समावेश करणं खूप फायदेशीर आहे. डाळीचं सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होऊन अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.


तूर डाळ


तूर डाळमध्ये प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तूर डाळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयाला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. तूर डाळ एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.


चणा डाळ


चणा डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. प्रथिने शरीराचे स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करतात. चणा डाळीमध्ये फायबर असते, यामुळे पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर होते. फायबरचे सेवन हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.


मसूर डाळ


मसूरमध्ये फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मसूर डाळीमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.


मूग डाळ 


मूग डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मूग खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. याच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि हृदयाचे स्नायू बळकट होतात. मूग डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात जे हृदयाच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स हृदयाला मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतात आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात.


चवळी 


चवळीमध्ये फोलेट, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे होमोसिस्टीन कमी होण्यास मदत करू होते. होमोसिस्टीन वाढणे हे, हृदयरोगाचे प्रमुख कारण आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Coronavirus : तुमच्या फोनवरही कोविड व्हायरस? मोबाईलमुळे कोरोना विषाणू पसरला? संशोधनात धक्कादायक माहिती उघड