Health : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन यामुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. तर अनेकांचं वजन वाढत असल्याच्या समस्या उद्भवत आहेत. तुम्हाला माहित आहे का? वजन कमी करण्यासाठी न्याहारी म्हणजेच ब्रेकफास्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य न्याहारी खाल्ली, तर त्यामुळे शरीरात संपूर्ण दिवस ऊर्जा तर राहतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते. काही लोक वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता टाळतात, परंतु यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी पोहे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. (Pohe for weight loss)
पोहे खाऊन वजन कसं कमी करायचं?
पोहे हा पौष्टिकतेने परिपूर्ण नाश्ता आहे. यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार याबाबत माहिती देत आहेत आहारतज्ज्ञ राधिका गोयल. राधिका एक प्रमाणित आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. त्यांच्या मते, नाश्ता खाल्ल्याने तुम्ही सुमारे 5 किलो वजन कमी करू शकता. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी पोहे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु तुम्ही वजन कमी करण्यासाठी घाई करू नका, तर केवळ आरोग्यदायी पर्यायांवर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला वजन कमी करण्यात अडचण येत असेल, तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब चयापचय, अशा परिस्थितीत तुम्ही चयापचय वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पोह्यांमध्ये लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि कार्ब्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यात खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
- पोह्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
- हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही.
- पोहे पचायला खूप सोपे आहेत. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांनी त्यांच्या आहारात पोह्यांचा समावेश करावा.
- हे आवश्यक नाही की तुम्ही पोहे फक्त नाश्त्यातच खाऊ शकता,
- रात्रीच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यातही खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी पोहे कसे बनवायचे?
- वजन कमी करण्यासाठी अगदी कमी तेलात पोहे बनवा.
- ऑलिव्ह ऑईल किंवा तूप कमी प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा.
- त्यात भरपूर भाज्या घाला.
- प्रोटीनसाठी तुम्ही त्यात चीजही घालू शकता.
- निरोगी चरबीसाठी, आपण त्यात शेंगदाणे किंवा काजू देखील घालू शकता.
- पोहे फक्त एक चतुर्थांश खायचे आहे.
- पोहे वाफवून खाल्ल्यास अधिक आरोग्यदायी आहे.
हेही वाचा>>>
Health : तुमच्या किचनमध्येच आहे वजन कमी करण्याचे रहस्य! वेट लॉसचा प्रवास होईल सोपा, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )