Health Tips: आजकाल लहान-मोठ्या पार्टीत किंवा कोणत्याही फंक्शन, गेट टुगेदरमध्ये दारूचा (Alcohol) वापर सर्रास झाला आहे. सतत पार्टी करणाऱ्या लोकांना दारु पिण्याची सवय असते, त्यामुळे ते जवळजवळ दररोज मद्यपान करतात. जे लोक रोज दारू पितात त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. रोज दारु पिणाऱ्यांना दारू सोडणं ही खूप अवघड गोष्ट असते. पण त्यांनी जर हे केलं तर एकाच महिन्यात त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
द्वारका येथील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. संजय गुप्ता सांगतात की, जे लोक 2-3 दिवसांच्या अंतराने दारू (Alcohol) पितात त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या बळावू शकतात.
जे लोक आठवड्यात एक दिवसापेक्षा जास्त वेळा दारू पितात...
ग्रेटर नोएडा येथील 'शारदा हॉस्पिटल'चे डॉक्टर आणि एमडी प्रोफेसर डॉ. श्रेय श्रीवास्तव यांच्या मते, जे लोक रोज 500 मिली पेक्षा जास्त दारू पितात, त्यांच्या आरोग्यावर दारुचा खूप वाईट परिणाम होतो. यूएसएच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोहोलिझम'च्या मते, जर तुम्ही आठवड्यात एक दिवसाहून अधिक काळ दारू पित असाल तर याचा अर्थ तुमच्या आरोग्यावर दारुचा वाईट परिणाम होतोय.
महिनाभर दारू सोडली तर...
'उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स'चे संस्थापक-संचालक डॉ. शुचिन बजाज यांच्या मते, ज्या व्यक्तीला जास्त दारू पिण्याची सवय असते त्यांना शारीरिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागतं. सतत दारु पिणाऱ्यांनी दारु सोडण्याचा विचार करावा. मद्यपान केल्याने नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे दारू सोडण्याचा विचार करणेच चांगले. महिनाभर दारू सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतील? हे अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यावेळी, अल्कोहोल सोडण्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात, असं समोर आलं.
महिनाभर अल्कोहोलपासून दूर राहिल्याने यकृताचे कार्य सुधारू शकते. यकृताचे कार्य सुधारल्याने रोगाचा धोका कमी होऊ शकतो. दारु न प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी संभवतो. या सर्व आजारांसोबतच उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही कमी राहतो. डॉ. बजाज यांच्या मते, जास्त मद्यपान करणाऱ्यांसाठी महिनाभर मद्यपानापासून दूर राहिल्याने शरीर निरोगी होऊ शकते. यकृतही निरोगी राहते. शरीराचा लठ्ठपणा कमी होऊ शकते. यासोबतच तुमची स्मरणशक्ती आणि मनाची एकाग्रताही वाढते.
हेही वाचा:
Health Tips: दुपारी झोप घेतल्याने होतात 'हे' 7 फायदे; तुम्हाला माहिती आहेत का?