Health Tips: ड्रायफ्रुट्स हे शरीरासाठी फायदेशीर आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये (Dryfruits) भरपूर जीवनसत्त्वं, लोह आणि फायबर असतात. तुम्हाला तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवायचं असेल तर ड्रायफ्रुट्स (Dryfruits) खाणं हा सर्वात सोपा उपाय आहे. त्यामुळे पचनशक्तीही वाढते. पण आता प्रश्न पडतो की रोज ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जर एखाद्या व्यक्तीने ते दररोज खाल्ले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होईल? तुमचं आरोग्य कसं बदलणं अपेक्षित आहे? यावर तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया.
रोज ड्रायफ्रुट्स खाण्याचे फायदे
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तुमच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा (Dryfruits) समावेश करणं हा आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे. कारण ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वं (Vitamins), लोह (Iron) आणि फायबर (Fiber) असतात. हे केवळ बीपी नियंत्रित करत नाही तर हृदयही निरोगी (Healthy Heart) ठेवते. पचनासाठी आणि आतड्यासाठी ड्रायफ्रुट्स खूप चांगले आहेत, ते पोट देखील निरोगी ठेवते. जर तुम्ही नाश्त्यात ड्रायफ्रुट्स खाल्ले तर तो उत्तम परिपूर्ण नाश्ता ठरेल, यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक गोष्टी मिळतात.
यासोबत ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन देखील नियंत्रणात राहते. हे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे निरोगी राहायचं असेल तर रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करायला पाहिजे. ड्रायफ्रुट्समध्ये लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. हे मेंदूच्या विकासासाठी देखील खूप चांगलं आहे. हे खाल्ल्यानंतर आपल्याला दिवसभर उत्साही वाटतं.
ड्रायफ्रुट्स खात असाल तर जेवणात मीठ आणि साखरेचा वापर कमी करा
जर तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स (Dryfruits) खाल्ले तर तुमच्या आहारात साखर (Sugar) आणि मीठाचं (Salt) प्रमाण कमी असावं, कारण त्यात कॅलरीज (Calories) जास्त असतात. ड्रायफ्रुट्स तुम्ही जास्त खाऊ नये कारण त्यामुळे वजनही वाढू शकतं. जर तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्स खात असाल तर ते कमी प्रमाणात खा.
ड्रायफ्रूट्स तुमच्या आहारात पौष्टिक घटक वाढवत असतील तरी ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. ड्रायफ्रूट्स खाताना तुम्हाला थोडा संयम राखण्याची गरज आहे, कारण यामुळे तुमचा बीपी देखील वाढू शकतो. जेव्हा तुम्ही ड्रायफ्रुट्स खाता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ते किती प्रमाणात खाता.
हेही वाचा:
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी रोज प्या जिऱ्याचे पाणी; 'या' आहेत सर्वात प्रभावी पद्धती