Health Tips : मानेचा कर्करोग (Cancer) हा जगभरातील 10 सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. भारतातील एक चतुर्थांश पुरुष आणि महिला कर्करोगाचे रुग्ण आहेत. मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे क्वचितच दिसतात. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करू शकतो. पण ही लक्षणे सुरुवातीलाच ओळखली गेली तर वेळीच या आजारावर मात करता येते. खरंतर, मानेच्या कर्करोगाची लक्षणे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी दिसतात. एचपीव्ही (HPV) लसीकरणामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. या आजाराची सुरुवातीची लक्षणं कोणती ते जाणून घेऊयात.
मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची काही लक्षणे अशी आहेत :
आवाजात बदल
मानेच्या कर्करोगामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. दिर्घकालीन खोकल्याप्रमाणेच कान दुखणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. ही लक्षणे इतकी सामान्य असतात की बर्याच वेळा लोक हा एक सामान्य आजार किंवा हवामानामुळे होणारा आजार समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हालाही शरीरात अशी काही लक्षणे दिसली तर त्यावर वेळीच उपचार करा, नाहीतर ही लक्षणं कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात.
घसा खवखवणे
मान दुखण्याचा त्रास कधीकधी कर्करोगामुळे होऊ शकतो. काहीवेळा जेवण जेवण्यात खाण्यात अडचण, पाणी पिण्यास त्रास होणे, घशात खवखवणे अशी कॅन्सरची लक्षणं दिसतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
न भरणाऱ्या जखमा
कर्करोगाने जर तुमच्या शरीरात प्रवेश केला असेल, तर कोणतीही जखम लवकर बरी होत नाही. असे अनेकदा म्हटले जाते. जर तुमच्या शरीरात अशी लक्षणे दिसत असतील तर काही खास गोष्टींची विशेष काळजी घ्या. शरीरावर कोणतीही जखम दीर्घकाळ राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी बोला.
मान कर्करोग टाळण्यासाठी मार्ग
जर तुम्हाला मानेचा कर्करोग टाळायचा असेल तर दारू आणि तंबाखूचं सेवन करू नका. तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. जास्त धुळीत राहू नका. जेणेकरून तुमचा कर्करोगापासून बचाव होईल. HPV लस अवश्य घ्या. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. तुम्हाला सुद्धा या आजारापासून स्वत:ला दूर ठेवायचं असेल तर या लक्षणांकडे दुर्लभ करू नका आणि लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :