Health Tips : हृदयविकाराचा झटका (Heart Attack) प्राणघातक असू शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि आहार यामुळे ही समस्या वाढताना दिसतेय. अशा वेळी दैनंदिन दिनचर्येतील बदलांबरोबरच हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणं समजून घेतल्यास हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो. खरंतर, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर कोणत्या प्रकारचे सिग्नल देते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

1. सहज थकवा येणे


आपण काम केल्यानंतर थकवा जाणवणे ही सामान्य बाब आहे. पण, जर तुम्हाला अचानक जास्त घाम येण्यास सुरुवात झाली तर हे शरीरातील आजारांचे लक्षण असू शकते. ज्या लोकांना पूर्वी कमी घाम येत होता आणि आता जास्त घाम येत आहे त्यांनी वेळीच काळजी घ्यावी. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

2. पचनशक्ती कमकुवत होणे 


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नाही किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही आजार होतो तेव्हा पचनसंस्था बिघडू लागते. योग्य आहार आणि जीवनशैली असूनही पचनाशी संबंधित समस्या असल्यास ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

3. श्वासोच्छवासात बदल 


हृदयविकाराच्या बाबतीत, श्वासासंबंधी समस्या देखील उद्भवू लागतात. यामुळेच जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. श्वासोच्छवासात अचानक बदल होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
  

4. शरीराच्या डाव्या बाजूला कमकुवतपणा


जेव्हा हृदय योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीराच्या डाव्या बाजूला खांदा, जबडा किंवा हात दुखू लागतात. हृदयामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास शरीराचा डावा भाग कमकुवत होऊ लागतो. शरीराच्या डाव्या बाजूला अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नका. 

5. जास्त घाम येणे


जास्त घाम येणे हे देखील शरीरातील अनेक आजारांचे लक्षण असू शकते. याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच जास्त घाम येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. जर असे अचानक घडत असेल किंवा रात्री झोपताना जास्त घाम येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.