Health Tips : सध्याच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याचे (Heart Attack) प्रमाण वेगाने वाढत चाललं आहे. आजकाल तरूणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढतोय.  अशी प्रकरणे समोर येत आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अतिकामाचा ताण, अयोग्य आहार आणि बदललेली जीवनशैली. हृदयविकाराचा झटका आला तर पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून योग्य आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या खाण्याच्या सवयी, शरीराचे वजन, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तातील साखरेची पातळी यावर परिणाम होत असल्याचे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारावर उपचार केले गेले असतील, तर आहारात बदल करून पुन्हा हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो. 
 
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी 'हा' आहार निवडा
 
आहारात संतुलित आहार घ्या


हृदयाचा त्रास असलेल्या लोकांनी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्या आहारात ताज्या भाज्या, फळं आणि प्रथिनांचा समावेश करावा.  
 
तुमच्या आहारात ओमेगा-3 चा समावेश करा


मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड हृदयासाठी खूप चांगले मानले जातात. एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल आणि बदाम यांसारखे भरपूर मोनोसॅच्युरेटेड फॅट्स खा. या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
 
फायबर समृद्ध आहार घ्या


संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. ब्राऊन राईस आणि क्विनोआसारखे संपूर्ण धान्य शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपले हृदय निरोगी ठेवतात. ब्रोकोली, गाजर आणि पालेभाज्या हृदयासाठी चांगल्या असतात.
 
दुग्धजन्य पदार्थांचं सेवन 


कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेले दुग्धजन्य पदार्थ हृदयविकार टाळण्यास मदत करतात. कमी फॅट असलेले पदार्थ जास्त चरबीयुक्त पदार्थांपेक्षा चांगले असतात. यापैकी फॅट फ्री दही, चीज आणि दुधाचं सेवन करावं. 
 
हृदयरोग्यांनी 'या' गोष्टी टाळाव्यात
 
मिठाचं प्रमाण कमी करा


हृदयरोगींनी मीठ कमी खावे. कमी प्रमाणात मीठ घेणे शरीरासाठी चांगले असते, परंतु जास्त मीठ रक्तदाब वाढवते. 
 
मद्यपान करू नका


मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयाच्या समस्या, पक्षाघात आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत मद्यपान करू नये.  
 
तळलेले पदार्थ खाऊ नका


तळलेले पदार्थ जसे फ्रेंच फ्राईज आणि तळलेले चिकन शरीराला नुकसान पोहोचवतात, त्यामुळे ते खाऊ नयेत. तसेच प्रक्रिया केलेले स्नॅक्स, फास्ट फूड आणि व्यावसायिक भाजलेले पदार्थ खाणे टाळा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा