Healthy Vegetables : पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन म्हणजे सुख. या भजी कधी बटाट्याच्या केल्या जातात तर कधी कांद्याच्या. पण जर तुम्हाला भजीचाही आनंद घ्यायचा असेल आणि आरोग्यही नीट ठेवायचे असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही हिरव्या पानांच्या भाज्यांबदद्ल माहिती देणार आहोत. यांचा वापर करून तुम्ही भजी करू शकता आणि पावसाळ्यातील आजारांपासून तुमचे संरक्षणही करू शकता. या हिरव्या भाज्या कोणत्या ते जाणून घ्या. 


या पानांपासून बनतात अप्रतिम भजी : 



  • अरबीची पाने

  • तुरीची पाने

  • भोपळ्याची पाने


पानांपासून भजी कसे बनवायचे?



  • भजी बनविण्यासाठी तयार केलेले पिठ हे सहसा थोडे सैल असते. पण पानांपासून भजी बनवताना पीठ थोडे घट्ट ठेवा.

  • आता हे पीठ बाजूला ठेवा आणि ज्या पानांपासून भजी बनवायचे आहेत ते धुवून स्वच्छ करा.

  • मंद आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये तेल घाला. आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास मोहरीचे तेल उत्तम ठरेल. 

  • आता एक पान घ्या आणि प्रथम ते टिश्यू किंवा कापडाने पूर्णपणे पुसून टाका जेणेकरून त्यावर साचलेले पाणी निघून जाईल आणि नंतर हे पिठ पानावर पूर्णपणे पसरवा.

  • आता पिठलेले पान एका बाजूने धरा आणि ते लाटण्यास सुरुवात करा. तयार रोल काळजीपूर्वक उचला आणि गरम तेलात तळण्यासाठी सोडा. 

  • हा रोल मंद आचेवर शिजवावा म्हणजे पाने जळणार नाहीत आणि पीठ आत शिजेल. रोल मधून मधून ढवळत राहा म्हणजे तो चांगला शिजला.

  • शिजलेला रोल बाहेर काढून भजीच्या आकारात कापून पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. तुम्हाला हवे असल्यास सॉससोबत हे भजी खाऊन मस्त आनंद घ्या. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :