ORS Week Celebration : ओआरएस (ORS) हे क्षार आणि साखर यांचे मिश्रण आहे. अतिसारामध्ये (Diarrhea), तुमच्या शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स तसेच सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम, बायकार्बोनेट इत्यादी नष्ट होतात. शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता जर क्षार आणि पाणी यांनी भरून काढली नाही तर dehydration होते. सध्या ओआरएस आठवडा सुरु आहे. या संदर्भात नवी मुंबई असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्सने दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या ओआरएसचे फायदे. 


तुमच्या बाळाला अतिसार झाला आहे हे तुम्हाला कसे कळेल?


सामान्य स्टूलपेक्षा जास्त पाणचट किंवा पूर्णपणे पाणचट मल हे सूचित करते की मुलाला अतिसार आहे. 


अतिसाराची लक्षणे : 


जर तुमच्या बाळाला दोनपेक्षा जास्त लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 


1. जर बाळ अस्वस्थ होत असेल, सतत चिडचिड,चक्कर येत असेल तर...


2. डोळे बारीक झाले असतील 


3. जर बाळाला वारंवार तहान लागत असेल किंवा पाणी पिता नसेल तर (हे 2 महिन्यांपेक्षा कमी असलेल्या बाळांना लागू होत नाही.)


ओ आर एसचे फायदे :


1. बाळाच्या आहारातील मिठाची कमतरता भरून काढते. त्याचबरोबर शरीरातील आवश्यक पोषक घटक भरून काढते. 


2. सततच्या उलट्या होणे आणि अतिसारासारख्या आजाराचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. 


3. शरीराला हायड्रेटेड ठेवते. तसेच अतिसारापासून लवकर बरे होण्यास फायदेशीर ठरते. 


ओआरएस सोल्युशन बनविण्याची प्रक्रिया : 


एका भांड्यात 1 लिटर गरम पाणी घ्या. त्यामध्ये 1 मोठं ओआरएसचं पॅकेट घाला. ही पावडर पाण्यात एकजीव होईपर्यंत तिला चमच्याने ढवळत राहा. 


वेगवेगळ्या वयोगटातील ओआरएस देण्याचे प्रमाण : 


1. दोन महिन्यांपेक्षा लहान बाळ असल्यास प्रत्येक मोशननंतर पाच चमचे ओआरएस देणे. 


2. दोन महिने ते दोन वर्षांपर्यंत बाळ असल्यास प्रत्येक मोशननंतर 1 ग्लासात थोड्या कमी प्रमाणात ओआरएस देणे. 


3. दोन ते पाच वर्षांपर्यंत मूल असल्यास प्रत्येक मोशननंतर 1 पूर्ण ग्लास आणि दुसरा किंचित भरलेला ग्लास ओआरएस देणे. 


अतिसारापासून दूर राहण्यासाठी लहान बाळांना ओआरएसची पावडर दिली जाते. 


झिंकचे फायदे : 


1. अतिसाराचे प्रमाण कमी करण्यासाठी झिंकचा वापर केला जातो. 


2. तीन महिन्यांच्या बाळांना अतिसारापासून रक्षण करण्यास फायदेशीर. 


3. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास फायदेशीर. 


वेगवेगळ्या वयोगटातील बाळांसाठी झिंकचे औषध कसे द्यावे?


1. दोन ते सहा महिने असलेल्या बाळांसाठी 1/2 गोळ्या (10mg) पाण्यातून किंवा आईच्या दुधातून मिक्स करून द्यावे. 


2. सहा महिने ते पाच वर्षांच्या मुलांसाठी 1 गोळी (20mg) पाण्यातून किंवा आईच्या दुधातून मिक्स करून द्यावे. 


टीप : झिंकच्या गोळ्यांचा वापर 14 दिवसांसाठी रोज दिवसातून एकदा करावा. 


महत्वाच्या बातम्या :