Health Tips : मधुमेहाची (Diabetes) समस्या ज्या वेगाने वाढतेय ती परिस्थिती चिंताजनक आहे. याचं कारण म्हणजे एका नवीन अभ्यासात या संदर्भात धक्कादायक खुलासा झाला आहे. या अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की, भारतात प्रत्येक 5 मधुमेही रुग्णांच्या रक्तपेशी खराब होतात. त्यामुळे अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे आणि मज्जातंतूंचे नुकसान यांसारखे आजार होऊ शकतात. मधुमेह हा एक दिर्घकालीन आजार आहे. जेव्हा स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा आपले शरीर तयार होणारे इन्सुलिन योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम नसते तेव्हा मधुमेहाची समस्या निर्माण होते. या अभ्यासात नेमकं काय म्हटलंय? तसेच मधुमेहाच्या रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी? हे जाणून घेऊयात.


अभ्यास काय म्हटलंय?


या अभ्यासात 6,234 लोकांवर अभ्यास करण्यात आला. तेव्हा असं आढळून आलं की, मधुमेह ही एक उच्च-जोखीम समस्या होऊ लागली आहे. यापैकी 3.3 टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा त्रास होऊ शकतो. तर 18 टक्के लोकांना डोळे, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. तसेच, इतर लोकांना देखील गंभीर आजार होऊ शकतात. 'एंडोक्राइनोलॉजी, मधुमेह आणि चयापचय' नावाचा हा अभ्यास नुकताच 'Peer Reviewed Medial Journal' मध्ये प्रकाशित झाला आहे.


या अभ्यासात असे आढळून आले की, मधुमेहाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपण जे काही खातो-पितो त्यातून ऊर्जा मिळवण्याची आपल्या शरीराची क्षमता कमी होते. हा एक असा आजार आहे ज्याचा हृदय, नसा, मूत्रपिंड, डोळे आणि नखं तसेच इतर अवयवांवर वाईट परिणाम होतो. एका अहवालानुसार, मधुमेहामुळे, 60 टक्के लोक लठ्ठ आहेत, त्यापैकी बहुतेकांना उच्च रक्तदाब आहे आणि 10 टक्के लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे.


मधुमेह कधी धोकादायक आहे? 


डॉक्टरांच्या मते, वाईट A1C परिणामांमुळे मधुमेहाचा धोका सर्वात जास्त वाढतो. A1C ही तीन महिन्यांतील सरासरी साखर पातळीची चाचणी आहे. यामुळे बाधित झालेल्या 40 टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि उर्वरित लोकांना न्यूरोपॅथीसारख्या समस्यांनी ग्रासले आहे. अनियंत्रित रक्तातील साखरेमुळे मधुमेहाची समस्या गंभीर बनू शकते. त्यामुळे नसा आणि रक्तपेशी खराब होतात, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दोन ते तीन पटीने वाढतो आणि किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. तंबाखू, सिगारेट आणि अल्कोहोलचे वाढते सेवन हे मधुमेह होण्याचे मुख्य कारण आहे.


भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आपण योग्य काळजी घेत नाही. मधुमेहामुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. अहवालानुसार, भारतातील मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्या, 18 वर्षांवरील 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर 25 दशलक्ष लोक प्री-डायबेटीक आहेत. तसेच, 50 टक्के लोकांना अजूनही साखरेची पातळी काय आहे याबद्दल माहिती नाही. तर मुंबईत राहणार्‍या 18 टक्के लोक आणि दर पाचपैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे.


मधुमेहात काय करावे?


1. मधुमेह टाळण्यासाठी फक्त डोळ्यांच्या आणि हृदयाच्या तपासणीबरोबरच दर तीन महिन्यांनी लघवीची तपासणीही करणं गरजेचं आहे. 
2. रोज व्यायाम करावा.
3. जेवणाबाबत काळजी घ्यावी.
4. पुरेशी झोप घेतली पाहिजे.
5. तंबाखू, सिगारेट आणि दारूपासून दूर राहा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं