Flu and Heart Attack : सध्या वातावरणातील बदल अनिश्चित असे आहेत. त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच बदत्या जीनशैलीचाही माणसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. याचा बहुतांश लोक गांभीर्याने विचार न करता हलक्यात घेत असतात. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वातावरणातील अचानक झालेल्या बदलांमध्ये अलर्ट राहायला हवे. विशेषत: फ्लूसारख्या साध्या समजल्या जाणाऱ्या आजारालाही गांभीर्याने घ्यायची गरज निर्माण झाली आहे. कारण अलीकडेच फ्लूवर एक संशोधन करण्यात आले असून यात असा इशारा देण्यात आला आहे की, फ्लूच्या लक्षणांमुळे हृदय विकाराचा धोका दुप्पट वाढला आहे. त्यामुळे वेळीच अलर्ट राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच सध्या व्हायरल फ्लूचे प्रमाण वाढले असून फ्लूचे स्वरूपही सतत बदलत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या धोकादायक फ्लूंच्या परिणांबाबत सविस्तर जाणून घेऊया...


वारंवार होणारे सर्दी, पडसे यांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे 


अलीकडेच आलेल्या फ्लूच्या स्टडीवरून वैद्यकीय शास्त्रज्ञांनी धोकादायक इशारा दिल्यानुसार, कोरोना दरम्यान हर्ट ब्लॉकेजचे प्रमाण वाढल्याचं दिसून आले आहे. यामध्ये हृदयाच्या धमण्यांमध्ये रक्तपुरवठा करताना अडथळा निर्माण होत असतो. अशावेळी हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगण्यात आले आहे. याचे कारण फ्लूचे स्वरूप वारंवार बदलत असून त्यामुळे याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे, असं संशोनातून समोर आले आहे.  


या सर्व पार्श्वभूमीवर हृदयविकाराचा धोका वाढण्यामागे व्हायरल फ्लूच कारणीभूत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण याबद्दल आणखीन तरी कोणत्याही प्रकारचे तथ्य जगासमोर आले नसून यावर अजूनही संशोधन सुरू असल्याचे समजतं. या संशोधकाच्या चमूकडून असा शोध घेतला जात आहे की, कोरोनामुळे हृदयविकाराचा वाढता धोका व्हायरल फ्लूमध्येही आहे का?  तसेच आणखीन एका संशोधनातून असे आढळून आले आहे की,  फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आहे. तसेच अनेक लोकांना तर एक आठवड्यानंतर हृदयविकाराचा झटका आला होता. असे संशोकांना आडळून आले आहे.


व्हायरल फ्लूमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका


सध्या फ्लूचे बदलते स्वरूप ब्लड क्लॉटिंगचा धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे. यामध्ये शरीराच्या आतून रक्त जमा होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते. याचे कारण कोरोना आणि फ्लूच्या व्हायरलमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याचे समजतं. याचे महत्त्वाचे कारण याची लक्षणे आणि सुरक्षिततेचा प्रकार बऱ्यापैकी एकसारखे असल्याचे समजतं. त्यामुळे व्यक्तीला फ्लूची लक्षणे असतील तर हलक्यात न घेता सजग राहणे आवश्यक आहे.


नेमकं संशोधनात काय सांगितले आहे


फ्लू आणि हृदयविकाराचा झटका यामध्ये काही संबंध आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये अशाच रूग्णांचा समावेश करण्यात आला होता की, ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला होता म्हणून रूग्णालयात भर्ती करण्यात आले होते. यासाठी प्रयोगशाळेतून माहिती गोळा करण्यात आली होती. यानंतर संशोधकांच्या चमूला असे दिसून आले की, एकूण 401 लोकांना फ्लूमधून बरं झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच एकदा हृदयविकाराचा झटका आल्याचे नक्की आला होता.  यातील हृदयविकाराचा झटका येणाऱ्यामध्ये 25 केस असे होते, जे एका आठवड्याच्या आतच आले होते. या सर्व पार्श्वभूमीवरू संशोधाकांच्या चमूंनी असं निष्कर्ष दिलं की, फ्लूचे वाढणे हे अचानाक कोरोना वाढण्यासारखेच आहे. त्यामुळे अशी काही फ्लूची लक्षणे जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष करणे धोकायदायक ठरू शकते. त्यामुळे बदल्या वातावरणात आरोग्या विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.