Health Tips : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि या दिवसांत बहुतेकांना जाणवणारा त्रास म्हणजेच संधिवात. संधिवात हा शब्द दोन शब्दांनी जोडला गेला आहे. एक म्हणजे संधी आणि दुसरा वात. संधी म्हणजे जॉइंट. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा जॉइंट दुखत असेल, सूज येत असेल तर आपण त्याला संधिवात असे म्हणू शकतो. शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा हा आजार मानला जातो. मात्र, असे असले तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' (Doctor Tips) या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 

या संदर्भात डॉ. विनायक पै (सहाय्यक प्राध्यापक, KEM) म्हणतात की, संधिवात म्हणजे कोणत्याही प्रकारचा सांधा शरीरात अधिक काळ दुखत असेल तर तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे असे समजा. 


संधिवाताचं कोणतंही एक प्रमुख कारण नसतं. त्यात पर्यावरणीय, जेनेटिक (आनुवंशिक) आणि ऑटो इम्युन इन्फ्लेमेशन या कारणांचा समावेश आहे. या सगळ्या कॉम्पोनेंट्सच्या इंटरॅक्शनमुळे हा रोग आपल्याला दिसतो. हा रोग विशेषत: महिलांमध्ये आणि 45 ते 60 वयोगटांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र, लहान वयोगटात आणि पुरुषांमध्येही या आजाराचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात दिसतं. रूमॅटोअॅथरायडिस हा आजार अनुवांशिक कारणामुळे सुद्धा होतो. 





संधिवाताची लक्षणं कोणती? 


या आजारात सांधे सुजतात आणि दुखतात. विशेषत: हातांची आणि पायांची बोटं घट्ट होतात. फक्त सांधेच नाहीत तर डोळे, फुफ्फुसं, हृदय आणि इतर अवयवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. संधिवातामुळे हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणूनच संधिवाताला फक्त सांध्याचा रोग मानून त्याकडे दुर्लक्ष करू नये. 


संधिवातावर उपचार काय?


सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजारावर एक टेस्ट करून आपण सांगू शकत नाही की या माणसाला संधिवात आहे. यासाठी पेशन्टचं संपूर्ण प्रोफाईल म्हणजेच, ब्लड टेस्ट, एक्स रे यांसारख्या अनेक टेस्ट करणं गरजेचं आहे. तसेच, संधिवातावर नवीन औषधं उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्याच्या मदतीने संधिवातावर मात करता येऊ शकते. 


संधिवात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी ?


1. संधिवात टाळण्यासाठी बॅलेन्स डाएट घेतलं पाहिजे. यामध्ये पालेभाज्या, प्रोटीन, कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर केला पाहिजे. 


2. व्यायाम शरीरासाठी अत्यंत गरजेचा आहे. यासाठी रोज सकाळी व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे. 


3. रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे खूप गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर संधिवातावर मात करता येते. 


4. काही संधिवातावर वेळीच उपचार केले तर त्यावर मात करता येते. तर, काही संधिवातावर उशिराने उपचार केले तर शुगर, बीपी यांसारखे त्रास होतात. यासाठी जर तुम्हाला त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. 


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Health Tips : महिलांमध्ये हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण नेमकं का वाढतं? वाचा यामागचं कारण, लक्षण आणि उपाय